Petrol Price Today : गेल्या काही दिवसात पेट्रोल व डिझेलच्या (diesel) दारात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ (growth) झाली होती. मात्र 15 ऑगस्टच्या (15 August) दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात (पेट्रोल-डिझेलची किंमत) कोणताही बदल झालेला नाही.
महाराष्ट्राव्यतिरिक्त (Maharashatra) उर्वरित राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शेवटचा बदल सुमारे तीन महिन्यांपूर्वी 22 मे रोजी दिसून आला होता. केंद्र सरकारने 21 मे रोजी केलेल कपात 22 मे पासून लागू झाली आहे. त्यावेळी पेट्रोल आठ रुपयांनी तर डिझेल सहा रुपयांनी स्वस्त झाले होते.
सुमारे महिनाभरापूर्वी महाराष्ट्रातील शिंदे सरकारने (Shinde Govt) राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटमध्ये कपात केली होती. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे पेट्रोलमध्ये प्रतिलिटर 5 रुपये आणि डिझेलमध्ये 3 रुपयांची कपात झाली आहे.
दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण (decline) होत आहे. मंगळवारी सकाळी डब्ल्यूटीआय क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 88.43 आणि ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 93.95 पर्यंत घसरली.
आजचे भाव काय आहेत? (16 ऑगस्ट रोजी पेट्रोल-डिझेलचे दर)
दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
मुंबई पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर
– चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
– नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर
– लखनौमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर
– जयपूरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर
– तिरुवनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर
– पाटण्यात पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर
– गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर
– बेंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर
– भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर
– चंदीगडमध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर
– हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर
– पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर
तुमचे शहराचे दर तपासा
पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर तपासण्यासाठी तेल कंपन्या एसएमएसद्वारे दर तपासण्याची सुविधा देतात. दर तपासण्यासाठी, इंडियन ऑइलच्या (IOC) ग्राहकाला RSP<deलर कोड> लिहून ९२२४९९२२४९ वर पाठवावे लागेल. HPCL ग्राहक 9222201122 वर HPPRICE <डीलर कोड> आणि BPCL ग्राहक RSP <डीलर कोड> 9223112222 वर एसएमएस करा.