बाजारभाव

Ahmednagar Bajarbhav : दररोज जेवण्यासाठी आवश्यक असलेल्या भाज्यांचे दर वधारले

Ahmednagar Bajarbhav : पाऊस लांबणीवर गेल्यामुळे उकाडा वाढत आहे त्याचा परिणाम भाजीपाल्यावर दिसत आहे. भाजीपाल्याची स्थानिक आवक घटली असून बाहेरून भाजीपाला येत असल्यामुळे भाजीपाला जास्त दराने घ्यावा लागत आहे.

दररोज जेवण्यासाठी आवश्यक असलेल्या भाज्यांचे दर वधारले आहे. वांगी, मिरची, कोथिंबीर, शिमला मिरची, गवार, चवळी, भेंडी, कारली या भाज्या ५० ते ६० रुपये प्रति किलोच्या दराने मिळत आहे. भाजीपाल्याचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.

तर दुसरीकडे कांद्याचे भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडत आहे. बदलत्या हवामानाचा शेतीव्यवसायाला सवसंधिक फटका बसत आहे. त्यामुळे अनेक वस्तुंचे भाव गगनाला भिडले आहेत. यापूर्वी टोमॅटोचा भाव उतरल्याने ते रस्त्यावर फेकून देण्यात आले होते.

पण आता टोमॅटोचा भाव ऐकून अनेकांचे चेहरे लाले लाल होत आहेत. अनेक भागात अद्यापही समाधानकारक पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे या भागात शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. तर ज्या भागात पाऊस झाला आहे.

त्या भागातील शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त झाला आहे. कांद्याला सर्वाधिक म्हणजे २००० रूपये क्विंटल एवढा भाव मिळाला होता. त्यानंतर जवळपास तोच भाव टिकून राहीला होता. भाव चांगला मिळत असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा विक्रीसाठी आनला जात आहे.

शनिवारी मात्र कांद्याला १८०० रूपये भाव मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंतीत झाले आहेत. शनिवारी २३६ ट्रक म्हणजे २५ हजार ९७५ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. यातील एक नंबर कांद्याला १४०० – १८००, दोन नंबर १००० – १४००, तिन नंबर ६०० – १०००, चार नंबर २०० – ६०० असा भाव मिळाला.

आठवडे बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. परिणामी भाजीपाल्यांच्या दरात तेजी आली आहे. अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळालेले दर:

टोमॅटो ३००० – ७०००, वांगी १५००-३०००, फ्लावर १५०० – ५५००, कोबी ६०० – २०००, काकडी ६००-२२००, गवार ३०००-७०००, घोसाळे १००० – ३०००, दोडका २०००-५०००, कारले २५०० – ६०००, कैरी २५०० – ३५००, भेंडी १०००- ३५००, वाल ३००० – ६०००, घेवडा ४०००-६०००,

बटाटे १३०० – २०००, लसूण ६५००- १६५००, हिरवी मिरची ३०००- ७०००, शेवगा २००० ५०००, भू. शेंग ३५००-५००० लिंबू ६०० १५००, आद्रक ७५०० – १६०००, गाजर १८०० २३००, दु. भोपळा ६०० – १५००, शिमला मिरची १५००-६०००, मेथी १००० -२८००, कोथिंबीर १६०० ३२००, पालक १००० २०००, शेपू भाजी २४०० – ३०००, चुका- चवळी १५००-३५००.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts