Ahmednagar Bajarbhav : राहाता येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी भाजीपाल्याची चांगली आवक झाली. शेवगा सरासरी १० हजार ५०० रुपये, गवार ९ हजार रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला.
यावेळी लिंबू ३ हजार ते ४ हजार रुपये, सरासरी ३ हजार ५०० रुपये, आद्रक ३ हजार ५०० ते १० हजार रुपये तर सरासरी ६ हजार ७०० रुपये, बटाटा सरासरी १ हजार ७०० रुपये,
भेंडी किमान २ हजार रुपये, जास्तीत जास्त ३ हजार रुपये, तर सरासरी ३ हजार ५०० रुपये. दूधी भोपळा ५०० ते १ हजार ५०० रुपये, सरासरी १ हजार रुपये. फ्लॉवर ५०० ते २ हजार ५०० रुपये, सरासरी १ हजार ५०० रुपये.
गाजर १ हजार ५०० ते २ हजार रुपये तर सरासरी २ हजार ५०० रुपये, गवार ७ हजार ते ७ हजार ५०० रुपये तर सरासरी ७ हजार २०० रुपये. काकडी २००० ते २ हजार ५०० रुपये, सरासरी २ हजार २०० रुपये.
कारली १००० ते १ हजार ५०० सरासरी १ हजार २०० रुपये. कोबी ५०० ते १ हजार रुपये तर सरासरी ८०० रुपये. लसूण १० हजार ते १३ हजार रुपये, सरासरी ११ हजार ५०० रुपये, ढोबळी मिरची २००० ते ३००० रुपये, सरासरी २ हजार ५०० रुपये. घोसाळी भाजी सरासरी २००० रुपये. दोड़का (शिराळी) २००० ते ३००० रुपये तर सरासरी २ हजार ५०० रुपये.
टोमॅटो ५०० ते १२०० रुपये, सरासरी ९०० रुपये. वांगी १००० ते ५००० रुपये, सरासरी ३००० रुपये. मिरची हिरवी २००० ते ३००० रुपये, सरासरी २ हजार ५०० रुपये. पिकेडोर २००० ते ३ हजार ५०० रुपये, तर सरासरी २७०० रुपये.
कढिपत्ता सरासरी १५ रुपये. कोथिंबीर नग किमान ८ रुपये, जास्तीत जास्त २५ रुपये तर सरासरी १६ रुपये. कांदा पात सरासरी १५ रुपये. मेथी भाजी १० ते २५ रुपये सरासरी १७ रुपये. पालक ८ ते १० तर सरासरी ९ रुपये. शेपु सरासरी १५ रुपये असा भाव मिळाला.
सोयाबीनची १३ किं टल सोयाबीनची आवक झाली. सोयाबीनला किमान ४ हजार ५०० रुपये, जास्तीत जास्त ४ हजार ८०० रुपये तर सरासरी ४ हजार ७५० रुपये भाव मिळाला. गव्हाला सरासरी २ हजार ६२५ रुपये भाव मिळाला. हरभरा (डंकी) सरासरी ४ हजार ५०० रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सचीव उद्धव देवकर यांनी दिली.