Soybean Bajar Bhav : सोयाबीन (Soybean Crop) हे महाराष्ट्रात उत्पादित केलं जाणारे एक मुख्य पीक आहे. राज्यातील बहुतांश शेतकरी बांधवांचे (Farmer) सर्व अर्थकारण सोयाबीन या नगदी पिकावर (Cash Crop) अवलंबून आहे.
मात्र गेल्या काही दिवसात सोयाबीनच्या दरात (Soybean Rate) सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. आज राज्यात 4 हजार 100 रुपये ते 5 हजार 100 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजारभाव (Soybean Market Price) मिळाला आहे.
मलकापूर एपीएमसीमध्ये तर सोयाबीनला 3 हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव (Soybean Bazar Bhav) मिळाला आहे. मात्र या बाजार समितीत सोयाबीनला 4115 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.
एकंदरीत सध्या राज्यात सध्या साडेचार हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास सर्वसाधारण बाजार भाव बघायला मिळत आहेत. तसेच जाणकार लोकांच्या मते या वर्षी सोयाबीनला पाच हजार रुपये प्रतिक्विंटलच्या आसपासच बाजार भाव राहणार आहेत.
मित्रांनो जस की आपणास ठाऊकच आहे आपण रोजच सोयाबीनच्या बाजारभावाची माहिती जाणून घेत असतो. आज देखील आपण सोयाबीन बाजार भावाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- माजलगाव एपीएमसीमध्ये आज 2358 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 4801 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच या बाजार समितीमध्ये सोयाबीनला साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.
उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती :- उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 875 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5142 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5121 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज एक हजार 700 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार 550 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 185 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 790 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- सोलापूर एपीएमसीमध्ये आज 755 क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4405 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला आहे. कमाल बाजार भाव पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 785 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती :- अमरावती एपीएमसीमध्ये आज 921 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4700 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 925 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 4812 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये 1944 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4300 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 4901 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 4751 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती :- हिंगोली एपीएमसीमध्ये 190 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4600 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 69 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 4834 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 640 क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार तीस रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 700 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- लातूर एपीएमसीमध्ये आज पाच हजार 804 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 190 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- अकोला एपीएमसीमध्ये 955 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार 150 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 950 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 4500 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती :- चिखली एपीएमसीमध्ये आज 110 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये चार हजार एक रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 4751 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 376 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती :- वाशिम एपीएमसीमध्ये आज 1200 कुंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 141 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
मुर्तीजापुर कृषी उत्पन्न बाजार समिती :- मुर्तीजापुर एपीएमसीमध्ये आज 1400 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार 450 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 970 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 795 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- मलकापूर एपीएमसी म्हणते आज 149 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला तीन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 51 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 4115 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.