Soybean Bajar Bhav : सोयाबीन (Soybean Crop) हे महाराष्ट्रात उत्पादित केले जाणारे एक मुख्य नगदी पीक (Cash Crop) आहे. या पिकाची खरीप हंगामात (Kharif Season) आपल्याकडे मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. सोयाबीन खरं पाहता एक प्रमुख तेलबिया पीक आहे.
मात्र गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात (Soybean Rate) सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. खरं पाहता गेल्या वर्षी सोयाबीनला 10 हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत हंगामाच्या सुरुवातीला बाजार भाव (Soybean Price) मिळाला होता. मध्यंतरी गेल्या वर्षी देखील सोयाबीन बाजार भावात घसरण झाली होती.
मात्र हंगामाच्या शेवटी पर्यंत सोयाबीन बाजार भाव सहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते. यामुळे या वर्षीदेखील गेल्यावर्षीप्रमाणे सोयाबीनला समाधानकारक बाजार भाव मिळणार अशी शेतकर्यांची आशा होती. मात्र, यावर्षी हंगामाच्या सुरवातीपासूनच अगदी मुहूर्ताला देखील सोयाबीनला चांगला बाजार भाव मिळालेला नाही.
सध्या सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा सर्वसाधारण बाजार भाव मिळत आहे. मात्र आज सोयाबीन बाजार भावात दोनशे रुपयांची वाढ झाली आहे. आज उदगीर एपीएमसीमध्ये झालेल्या लिलावात सोयाबीनला पाच हजार 220 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे. यामुळे येत्या काही दिवसात सोयाबीनच्या बाजारभावात वाढ होईल का हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
मात्र जाणकार लोकांच्या मते अद्याप सोयाबीनच्या उत्पादनाबाबत योग्य ती माहिती समोर आली नसल्याने सोयाबीन बाजार भाव बाबत कुठलही कथा न करणं थोडं अवघडच आहे. मात्र असे असले तरी पुढील एक-दोन महिने सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास सोयाबीनला बाजार भाव मिळण्याची शक्यता जाणकार लोकांनी नमूद केली आहे.
अशा परिस्थितीत सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना बाजारपेठेचा अंदाज घेऊन टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री करत राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मित्रांनो जस की आपणास ठाऊकच आहे आपण रोजच सोयाबीनच्या बाजारभावाची माहिती जाणून घेत असतो. आज देखील आपण राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या लिलावाची माहिती थोडक्यात जाणून घेणार आहोत.
उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज 16 ऑक्टोबर रोजी उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची 1640 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 241 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5 हजार 220 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
आष्टी कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 250 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या बाजारामध्ये सोयाबीनला 4200 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 4895 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 4500 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.