बाजारभाव

Soybean Bajarbhav : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ एका कारणामुळे सोयाबीन दरात होणार विक्रमी वाढ ; शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

Soybean Bajarbhav : सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. काही जाणकार लोकांनी सोयाबीन दरात वाढ होण्याची भविष्यवाणी केली आहे.

खरं पाहता हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीन अतिशय स्वस्त भावात विक्री होत होता. राज्यात बहुतांशी ठिकाणी सुरुवातीस सोयाबीनला मात्र 4000 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर मिळत होता. अशा परिस्थितीत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते.

दरम्यान आता सोयाबीन दरात सकारात्मक वाढ झाली आहे. केंद्र शासनाने स्टॉक लिमिट काढल्यानंतर सोयाबीन दरात वाढ होण्यास खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. सोयाबीन साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतच्या कमालदरात विक्री होत आहे. राज्यात काही ठिकाणी सोयाबीनला सहा हजार रुपये प्रतिक्विंटल पेक्षा अधिक दर मिळत आहे.

दरम्यान व्यापाऱ्यांकडून सोयाबीनची मोठ्या प्रमाणात साठवणूक केली जात असल्याचे वृत्त समोर येत आहे. व्यापाऱ्यांनी साठवणूक केली की आगामी काळात सोयाबीन दरात वाढ होण्याची शक्यता असते. यामुळे येत्या काही दिवसात सोयाबीन दरात विशेषता जानेवारी ते फेब्रुवारी पर्यंत दुपटीने वाढ होण्याचा अंदाज जाणकारांकडून वर्तवण्यात येत आहे. खरं पाहता या हंगामात पावसाच्या लहरीपणामुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला आहे. सुरुवातीला मान्सूनचे आगमन उशिरा झाले.

त्यामुळे सोयाबीनचा पेरा लांबला तसेच मध्यंतरी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाली यामुळे ऐनवाढीच्या अवस्थेत असलेले सोयाबीन पीक अतिवृष्टीमुळे बाधित झाले. अतिवृष्टीपासून शेतकऱ्यांनी कसेबसे सोयाबीन वाचवले तर शेवटी शेवटी ऐन काढणीच्या वेळी परतीचा पाऊस आला. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. शेतकऱ्यांच्या मते पावसाच्या या लहरीपणामुळे त्यांच्याकडे खूपच कमी प्रमाणात सोयाबीन उत्पादित झाले आहे. अशा परिस्थितीत सोयाबीन कमी दरात विक्री करणे त्यांना परवडत नाही. गेल्यावर्षीपेक्षा शेतकऱ्यांना सोयाबीनला अधिक दर मिळण्याची आशा आहे.

खरं पाहता गेल्यावर्षी सोयाबीनला आठ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत दर मिळत होता. हंगाम सरते शेवटी सोयाबीनला सात हजार रुपये दर मिळाला होता. त्यामुळे यावर्षी सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधव त्यापेक्षा अधिक दर मिळण्याची आशा बाळगून आहेत. हेच कारण आहे की आता बाजारात सोयाबीनची आवक कमी झाली आहे.

तसेच व्यापाऱ्यांनी सोयाबीन साठवणूक सुरू केली असल्याने येत्या काही दिवसात सोयाबीन दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तूर्तास बाजारात सोयाबीनचे आवक कमी झाली असल्याने तेल उत्पादक कंपन्यांकडून तसेच बियाण कंपन्यांकडून सोयाबीनची मागणी वाढली आहे. यामुळे आगामी काळात सोयाबीनचा बाजारात शॉर्टेज निर्माण होणार आहे आणि दर वाढण्याची शक्यता आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts