Soybean Bajarbhav : गेल्या वर्षी सोयाबीनला चांगला उच्च आणखी बाजार भाव (Soybean Rate) मिळाला होता. यामुळे यावर्षी सोयाबीन लागवडी खालील क्षेत्रात वाढ झाली आहे. महाराष्ट्रात देखील सोयाबीन लागवडी खालील क्षेत्र विशेष वाढले आहे. राज्यातील विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र तसेच खानदेशात देखील मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. आता राज्यात सर्वत्र सोयाबीनचे हार्वेस्टिंग सुरू आहे.
दरम्यान सोयाबीन हंगाम सुरू होऊन आता एक महिना उलटला आहे. मात्र असे असले तरी या हंगामात सोयाबीन बाजार भाव सुरुवातीपासूनच दबावात आहेत. यामुळे शेतकरी बांधवांची डोकेदुखी वाढत आहे. गेल्या वर्षी सोयाबीनला उच्चांक ही बाजार भाव मिळाला असल्याने या वर्षी देखील सोयाबीनला चांगला बाजार भाव मिळेल अशी शेतकऱ्यांची इच्छा होती मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनला उठाव नसल्याने सोयाबीनच्या बाजारभावात कमालीची घसरण झाली आहे.
सध्या आपल्या राज्यात सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटल ते 5500 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजार भाव मिळत आहे. मात्र आता सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. मध्यप्रदेश राज्यातून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळाला आहे.
मित्रांनो मध्य प्रदेश राज्यातील उज्जैन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला तब्बल 15 हजार 301 रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव मिळाला आहे. निश्चितच उज्जैन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळालेला हा बाजार भाव कमाल बाजार भाव आहे. मध्यप्रदेश राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनला साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपासच बाजारभाव मिळत आहे.
आपल्या महाराष्ट्रात देखील सोयाबीनला साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजारभाव मिळत आहे. निश्चितच उज्जैन मध्ये सोयाबीनला पंधरा हजार रुपये प्रति क्विंटलहुन अधिक बाजार भाव मिळाला असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव आहेत.
मात्र जाणकार लोकांच्या मते, सोयाबीनला मिळालेला हा बाजार भाव फसवा आहे कारण की सोयाबीनला मिळत असलेला सर्वसाधारण बाजारभाव हा अजूनही साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास स्थिरावला आहे. मात्र असे असले तरी यामुळे सोयाबीनच्या दरात भविष्यात वाढ होऊ शकते अशी आशा शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे.