Soybean Bajarbhav : महाराष्ट्रात सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. राज्यातील खानदेश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ म्हणजे जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात सोयाबीनची लागवड केली जाते. राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे सोयाबीन या नगदी पिकावर अर्थकारण अवलंबून असते. दरम्यान काल झालेल्या लिलावात सोयाबीन बाजारभावात घसरण झाली. खरं पाहता नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्र शासनाने तेलबिया आणि खाद्यतेलावर असलेली स्टॉक लिमिट काढून घेतली.
यामुळे सोयाबीन बाजाराला दिलासा मिळाला होता. सोयाबीन दरात किंचित वाढ झाली होती. मात्र काल काही बाजार समितीमध्ये सोयाबीन दरात घसरण झाली, तर काही बाजार समितीमध्ये बाजार भाव स्थिर राहिले. एकंदरीत काल सोयाबीन बाजाराची मिश्र स्थिती पाहायला मिळाली. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार प्रक्रिया प्लांट कडून सोयाबीनला कमी मागणी राहिल्याने आणि दर कमी केल्याने बाजार समितीमध्ये सोयाबीनचे बाजार भाव पडले.
काल शुक्रवारी झालेल्या लिलावात सोयाबीनला सरासरी पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल ते पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजार भाव मिळाला. निश्चितच सध्या मिळत असलेला बाजार भाव हा सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांच्या अपेक्षेप्रमाणे नाही. बहुतेक शेतकरी बांधव सोयाबीनला किमान सहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळण्याची वाट पाहत आहेत. सध्याची परिस्थिती पाहता जाणकार लोकांकडून सोयाबीन दराबाबत मोठं विधान करण्यात आलं आहे.
जाणकार लोकांच्या मते सध्याची बाजारातील परिस्थिती पाहता सोयाबीनला पाच हजार रुपये प्रतिक्विंटल ते 6000 रुपये प्रति क्विंटल पर्यंतच बाजारभाव मिळणार आहेत. अर्थातच शेतकरी बांधवांची 6000 रुपये प्रति क्विंटल एवढी दर मिळण्याची इच्छा पूर्ण होणार मात्र सरासरी बाजार भाव 6000 रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी राहिल्यास शेतकरी बांधवांना सहाजिकच मोठा आर्थिक नुकसान सहन कराव लागणार आहे.
खर पाहता गेल्यावर्षी सोयाबीनला चांगला विक्रमी दर मिळाला होता. यावर्षी देखील सोयाबीनला चांगला बाजारभाव मिळेल अशी शेतकऱ्यांची इच्छा होती. मात्र गेल्या वर्षीच्या बाजारभावासोबत सोयाबीन दराची तुलना केली असता सोयाबीनला सध्या अतिशय कवडीमोल दर मिळत आहे.