Soybean Bajarbhav : सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. मित्रांनो खरं पाहता केंद्र शासनाने खाद्यतेल व तेलबियावर लावण्यात आलेली स्टॉक लिमिट काढली असल्याने तेलबिया बाजारभावात मोठी वाढ होत आहे.
यामुळे सोयाबीनच्या दरात मोठी वाढ झाली असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. दरम्यान आज देखील राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन बाजारभावात वाढ होत आहे.
मित्रांनो आज चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन 6,300 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दरावर पोहचला आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव पाहायला मिळत आहेत.
मित्रांनो जसं की आपणास ठाऊकच आहे आपण रोज सोयाबीन बाजारभावाची माहिती जाणून घेत असतो. आज देखील आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळालेल्या बाजारभावाचे चर्चा करणार आहोत.
लासलगाव विंचूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- लासलगाव विंचूर एपीएमसी मध्ये आज सोयाबीनची 2,704 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लीलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5858 प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5 हजार 600 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
परळी वैजनाथ कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 2900 क्विंटल सोयाबीनचे अवघड झाली आज झालेल्या लिलावा त्या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5000 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून 5925 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजार मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5750 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :– या एपीएमसीमध्ये आज सोयाबीनची 1150 क्विंटल आवक झाली आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5750 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून कमाल तसेच सरासरी बाजार भाव देखील तेवढाच नमूद करण्यात आला आहे.
मोर्शी कृषी उत्पन्न बाजार समिती :- मोर्शी एपीएमसी मध्ये आज सोयाबीनची १०२० क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5818 प्रतिकूल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव ५६५७ रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- विदर्भातील एक महत्त्वाची बाजारपेठ अर्थातच नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 5372 क्विंटल एवढी लोकल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4650 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5611 रुपये प्रति गुंतला एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजारभाव 5371 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज दोन हजार क्विंटल एवढी सोयाबीनची आवक नमूद करण्यात आली. आज झालेल्या लिलावत या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 5199 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून सहा हजार पाच रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव ५६०२ रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- सोयाबीन लिलावासाठी डोळ्यातल्या जाणाऱ्या लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 17992 क्विंटल एवढी सोयाबीनची आवक नमूद करण्यात आली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5601 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 6153 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव ५९८० रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :– अकोला एपीएमसी मध्ये आज सोयाबीनची 7586 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4400 रुपये प्रति गुंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5665 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव ५३०० रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समिती :- यवतमाळ मध्ये आज 2765 क्विंटल एवढी सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5740 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. सर्वसाधारण बाजार भाव 5,370 प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती :- चिखली एपीएमसी मध्ये आज 4900 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला साडेचार हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून कमाल बाजार भाव 6300 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5400 प्रतिक्विंटल नमूद झाला आहे.