बाजारभाव

Soybean Bajarbhav : खरं काय ! ….असं झालं तर सोयाबीनचे दर वाढतील ; वाचा काय आहे कृषी तज्ञांचं मत

Soybean Bajarbhav : सोयाबीन (Soybean Crop) हे भारत वर्षात उत्पादित केले जाणारे एक मुख्य तेलबिया पीक आहे. या पिकाची महाराष्ट्रात देखील लागवड विशेष उल्लेखनीय आहे. शिवाय गेल्या वर्षी सोयाबीनला चांगला ऐतिहासिक बाजार भाव (Soybean Rate) मिळाला असल्याने यावर्षी सोयाबीन लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे.

गेल्या वर्षी सोयाबीनला सुरुवातीच्या टप्प्यात अकरा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा बाजार भाव (Soybean Market Price) मिळत होता. तदनंतर सोयाबीनच्या बाजाभावात घसरण झाली, मात्र शेवटी सोयाबीनला सहा हजार रुपये बाजार भाव मिळत होता. मात्र यावर्षी हंगामाच्या सुरवातीपासूनच सोयाबीन बाजार भाव दबावात आहे. आता सोयाबीन हंगाम (Soybean Season) सुरू होऊन जवळपास एक पंधरवडा उलटला आहे.

मात्र तरीदेखील सोयाबीन बाजारभाव दबावातच आहेत. सध्या सोयाबीन काढणी सुरु आहे. शेतकरी बांधव (Farmer) देखील दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पैसे उपलब्ध होतील या अनुषंगाने लवकरात लवकर काढणी करत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यात परतीचा पाऊस सुरू असल्याने सोयाबीन काढणीला ब्रेक लागत आहे. शिवाय यामुळे काढण्यासाठी आलेल्या सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला आहे. शिवाय सोयाबीन काढण्यासाठी देखील शेतकरी बांधवांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

शिवाय आता सोयाबीनला कोंबे देखील येऊ लागली आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडत आहे. एकंदरीत परतीच्या पावसामुळे काढण्यासाठी आलेले सोयाबीन पीक तसंच वावरात उभ आहे. दरम्यान, दिवाळी सण जवळ येत असल्याने शेतकरी बांधव खर्चाला पैसे उपलब्ध व्हावे या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात सोयाबीन विक्रीसाठी बाजारात दाखल करत आहेत. यामुळे महाराष्ट्रात सोयाबीन आवक वाढली आहे. प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्य मध्य प्रदेश राजस्थान आणि आपल्या महाराष्ट्रात सोयाबीनची आवक गेल्या तीन ते चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

आवक वाढली असल्याने सोयाबीन बाजार भाव स्थिर राहिले असल्याचे जाणकार लोकांनी नमूद केले आहे. मात्र असे असले तरी सध्या बाजारात सोयाबीनला कमी बाजार भाव मिळत असल्याने गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षी देखील शेतकरी बांधव सोयाबीन विक्री थांबवणार आहेत आणि सोयाबीन साठवणुकीवर भर देणार आहेत. याशिवाय परतीच्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान होत असल्याने दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात सुधारणा पाहायला मिळू शकते. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, सध्या बाजारात नवीन सोयाबीन चार हजार रुपये प्रतिक्विंटल ते 4 हजार 600 रुपये प्रति क्विंटलपर्यंत विक्री होत आहे.

तसेच जुना सोयाबीन 5200 रुपये प्रति क्विंटलपर्यंत विकला जात आहे. दरम्यान काही जाणकार लोकांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीनुसार, सोयाबीन पिकाचे यावर्षी किती नुकसान झाले आहे आणि सोयाबीनचे किती उत्पादन मिळेल याबाबत अजूनही अधिकृत आकडा येणे बाकी आहे. शिवाय याचा अंदाज बांधता येणे देखील यावेळी अशक्य आहे. मात्र असे असले तरी, या महिन्याच्या शेवटी सोयाबीन नुकसानीबाबत आणि सोयाबीनच्या उत्पादनाबाबत अचूक आकडा येणे अपेक्षित आहे.

या आकडेवारीत जर सोयाबीन पिकाचे अधिक नुकसान झाले असेल आणि सोयाबीन उत्पादन कमी होत असेल तर सोयाबीन दरवाढीची शक्यता असल्याचे जाणकार लोकांनी नमूद केले आहे. मात्र असे असले सध्या सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांनी पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा बाजारभाव लक्षात ठेवून सोयाबीनची टप्प्याटप्प्याने विक्री करणे त्यांच्यासाठी फायद्याचे राहणार आहे.

एकंदरीत सोयाबीन बाजार भाव वाढतो की नाही हे सर्वस्वी सोयाबीनचे किती नुकसान झाले आहे आणि किती उत्पादन मिळणार आहे यावर अवलंबून राहील. दिवाळीनंतर या सर्वांबाबत अधिक स्पष्टता येणार असल्याचे समजत आहे. त्यामुळे तोपर्यंत सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांनी टप्प्याटप्प्याने आणि आपल्या गरजेनुसार सोयाबीन विक्री करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts