Soybean Bajarbhav : मित्रांनो नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्र शासनाने एक मोठा निर्णय घेतला. केंद्र शासनाने तेलबिया आणि खाद्यतेलावर असलेले स्टॉक लिमिट काढून टाकले.
मित्रांनो खरं पाहता केंद्र शासनाने 2021 मध्ये खाद्यतेलाच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी तेलबिया आणि खाद्यतेलावर स्टॉक लिमिट लावले होते. खरं पाहता स्टॉक लिमिट डिसेंबर 2022 पर्यंत लावण्यात आले होते.
मात्र तेलाच्या किमती नियंत्रित आल्यानंतर केंद्र शासनाने स्टॉक लिमिट काढण्याचा निर्णय नुकत्याच काही दिवसांपूर्वी घेतला आहे. केंद्र शासनाने स्टॉक लिमिट काढल्यानंतर याचा सकारात्मक परिणाम सोयाबीन बाजारावर पाहायला मिळत आहेत.
मित्रांनो सोयाबीनच्या बाजारभावात गेल्या आठवड्याभरापासून रोजाना वाढ होत आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळत आहे. गेल्या आठ दिवसात सोयाबीनच्या बाजार भावात जवळपास आठशे रुपयांची वाढ नमूद करण्यात आली आहे.
दरम्यान सोयाबीनच्या बाजारभावात वाढ झाली असली तरीदेखील सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना येत्या काही दिवसात सोयाबीनच्या दरात अजून मोठी वाढ होण्याची आशा आहे. अशा परिस्थितीत बाजारात सध्या सोयाबीनची आवक खूपच कमी झाली आहे. मित्रांनो खरं पाहता गेल्या महिनाभरापासून सोयाबीन पाच हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंत विक्री होत होता.
मात्र आता यामध्ये वाढ झाली असून सोयाबीन सहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत विक्री होत आहे. मात्र असे असले तरी सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना सोयाबीनच्या भावात वाढ होण्याची आशा आहे. हेच कारण आहे की सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांनी सोयाबीनची विक्री थांबवली आहे.
मित्रांनो शेतकरी बांधवांच्या मते, यावर्षी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टी मधून शेतकरी बांधवांनी कसंबस सोयाबीनचे पीक वाचवलं पण परतीच्या पावसामुळे हातात तोंडाशी आलेले सोयाबीन हिरावून घेतलं गेलं. त्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली.
अशा परिस्थितीत उत्पादनात झालेले घट भरून काढण्यासाठी सोयाबीनला चांगला बाजार भाव मिळणे आवश्यक आहे. यामुळे शेतकरी बांधव सोयाबीनला चांगला बाजार भाव मिळाल्यानंतरच सोयाबीनची विक्री करणार असल्याचे चित्र आहे. दरम्यान केंद्र शासनाने स्टॉक लिमिट काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर सोयाबीनच्या दरात वाढ झाली असली तरी देखील शेतकऱ्यांना यामध्ये अजून वाढ होण्याची अपेक्षा आहे.