Soybean Bazar Bhav : मित्रांनो सोयाबीन (Soybean Crop) हे महाराष्ट्रात उत्पादित केले जाणारे एक प्रमुख नगदी पीक (Cash Crop) आहे. या पिकाची आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेती (Farming) केली जात असल्याने राज्यातील बहुतांश शेतकरी बांधव (Farmer) या पिकावर अवलंबून असतात.
दरम्यान जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार या वर्षी सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास बाजार भाव (Soybean Rate) मिळणार आहे. बाजारात देखील तसेच काहीसे चित्र आहे. आज राज्यात चार हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल ते पाच हजार 80 रुपये प्रति क्विंटल यादरम्यान सर्वसाधारण बाजार भाव (Soybean Market Price) मिळाला आहे.
आज राज्यातील काटोल कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सोयाबीनला तीन हजार 850 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांची काळजाची धडधड वाढू लागली आहे. सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना यामुळे सोयाबीनच्या दरात अजूनच घसरण होते की काय अशी शंका येऊ लागली आहे.
मात्र या एपीएमसीमध्ये देखील सर्वसाधारण बाजार भाव चार हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल एवढा राहिला आहे. मित्रांनो आपणास ठाऊकच आहे की, आपण रोजच सोयाबीनच्या बाजारभावाची माहिती जाणून घेत असतो. आज देखील आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळालेल्या बाजारभावाची चर्चा करणार आहोत.
उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती :- बाजार समितीमध्ये आज सोयाबीनची 1160 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 160 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव पाच हजार 80 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
राहता कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या एपीएमसीमध्ये सोयाबीनची 61 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 4944 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 450 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- सोलापूर एपीएमसीमध्ये आज 577 क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4205 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 65 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 750 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 885 क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4700 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 4921 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच 4810 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 1774 क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4300 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 780 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच चार हजार 660 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.
हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 180 क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4499 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार एक रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच चार हजार 699 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.
लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज चार हजार 681 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4351 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 186 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 884 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 900 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच 4555 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.
चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती :– चिखली एपीएमसीमध्ये आज 170 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4175 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 4801 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच 4488 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.
काटोल कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 31 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला तीन हजार 850 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 4500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 50 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.