Soybean Market Price: भारतात खरीप हंगामात (Kharif Season) मोठ्या प्रमाणात सोयाबीन या पिकाची (Soybean Crop) शेती केली जाते राज्यात देखील सोयाबीन लागवडीखालील (Soybean Farming) क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे.
राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण सोयाबीन या नगदी पिकावर (Cash Crop) अवलंबून असते. मित्रांनो खरं पाहता सोयाबीन हे खरीप हंगामातील पीक आहे. मात्र, गत वर्षी शेतकरी बांधवांनी उन्हाळी हंगामात देखील सोयाबीनची शेती यशस्वी करून दाखवली आहे.
यामुळे आता सोयाबीन फक्त खरीप हंगामातील पीक नसून उन्हाळी हंगामात देखील त्याची शेती केली जाते हे सिद्ध झाले आहे. राज्यात सोयाबीन एक मुख्य पीक असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी (Soybean Grower Farmer) सोयाबीनच्या बाजारभावाकडे (Soybean Rate) मोठे बारीक लक ठेवून असतात.
आम्हीदेखील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दररोज सोयाबीनचे ताजे बाजार भाव घेऊन हजर होत असतो. आज देखील आम्ही सोयाबीनचे तीन वाजेपर्यंतचे बाजार भाव घेऊन हजर झालो आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया सोयाबीनचे आजचे बाजारभाव सविस्तर.
उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती:- उदगीर मार्केट यार्डात आज सोयाबीनची 895 क्विंटल एवढी आवक नमूद करण्यात आली आहे. आज या बाजार समितीत सोयाबीनला कमीत कमी 6 हजार 350 रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव मिळाला असून जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार 411 एवढा होता. आज या मार्केट यार्डात सोयाबीन ला सहा हजार 380 एवढा ऍव्हरेज बाजार भाव मिळाला आहे.
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती:- अमरावती एपीएमसीमध्ये सोयाबीनची तब्बल तीन हजार 75 क्विंटल एवढी आवक नमूद करण्यात आली आहे. आज या बाजार समितीत 5750 येवढा कमीत कमी दर सोयाबीनला मिळाला असून जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे एवढा होता. आज अमरावती मार्केट यार्डात एव्हरेज सोयाबीनचा दर पाच हजार 975 एवढा नमूद करण्यात आला आहे.
हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती:- हिंगोली एपीएमसीमध्ये आज सोयाबीनचे 311 क्विंटल एवढी आवक नमूद करण्यात आली आहे. आज सोयाबीन ला या बाजार समितीत 5811 एवढा कमीत कमी दर मिळाला असून जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार 138 रुपये प्रति क्विंटल एवढा होता. सध्या बाजार समितीत सोयाबीनला पाच हजार 996 रुपये एवढा ऍव्हरेज बाजार भाव मिळाला आहे.
निफाड कृषी उत्पन्न बाजार समिती:- लासलगाव एपीएमसी अंतर्गत येणाऱ्या निफाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज 181 क्विंटल पांढऱ्या सोयाबीनची आवक नमूद करण्यात आली आहे. आज या बाजार समितीत सोयाबीनला कमीत कमी 4500 रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव मिळाला असून जास्तीत जास्त बाजार भाव 6111 रुपये नमूद करण्यात आला आहे. आज सोयाबीन ला या बाजार समितीत 6071 रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती:- आज अकोला एपीएमसी मध्ये सोयाबीनची 639 क्विंटल आवक नमूद करण्यात आली. आज या एपीएमसीमध्ये 5215 रुपये प्रति क्विंटल एवढा कमीत कमी दर सोयाबीनला मिळाला असून 6 हजार 350 रुपये प्रति क्विंटल एवढा जास्तीत जास्त बाजार भाव नमूद करण्यात आला. दरम्यान आज 6 हजार 195 रुपये एवढा सर्वसाधारण दर या बाजार समितीत राहिला.
बीड कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज बीड एपीएमसीमध्ये 114 क्विंटल सोयाबीनची आवक नमूद केली गेली असून 5 हजार 850 एवढा सोयाबीनला कमीत कमी दर मिळाला असून 6 हजार 120 रुपये प्रति क्विंटल एवढा सोयाबीन ला जास्तीत जास्त बाजार भाव या एपीएमसीमध्ये नमूद करण्यात आला आहे शिवाय एपीएमसीमध्ये 6 हजार 53 रुपये एवढा सर्वसाधारण तर नमूद करण्यात आला आहे.
पैठण कृषी उत्पन्न बाजार समिती :- पैठण एपीएमसीमध्ये आज सोयाबीन अशी तीन क्विंटल आवक होती. आज या एपीएमसीमध्ये 5 हजार 821 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला असून 5821 रुपये प्रति क्विंटल एवढा जास्तीत जास्त दर सोयाबीन ला मिळाला. ॲव्हरेज दर देखील 5821 रुपये एवढाच होता.
चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- चाळीसगाव एपीएमसीमध्ये आज सहा क्विंटल सोयाबीनचे आवक झाली आज सोयाबीनला 5 हजार 351 रुपये प्रति क्विंटल एवढा कमीत कमी दर मिळाला असून 5 हजार 481 रुपये प्रति क्विंटल एवढा जास्तीत जास्त दर मिळाला आज या एपीएमसीमध्ये 5 हजार 467 रुपये एवढा सर्वसाधारण दर सोयाबीनला मिळाला.
जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- जिंतूर एपीएमसीमध्ये आज सोयाबीनची 52 क्विंटल एवढी आवक नमूद केली गेली आहे. आज या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 6 हजार 100 रुपये एवढा कमीत कमी दर मिळाला असून 6 हजार 150 रुपये प्रति क्विंटल एवढा जास्तीत जास्त दर मिळाला. आज या एपीएमसीमध्ये 6 हजार 100 रुपये एवढा सर्वसाधारण दर नमूद करण्यात आला आहे.
मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज मलकापूर एपीएमसीमध्ये सोयाबीनची 283 क्विंटल आवक झाली. आज या एपीएमसीमध्ये 5 हजार 450 रुपये प्रति क्विंटल एवढा कमीत कमी दर सोयाबीनला मिळाला. तर 6 हजार 200 रुपये प्रति क्विंटल एवढा जास्तीत जास्त बाजार भाव सोयाबीनसाठी या एपीएमसीमध्ये नमूद करण्यात आला. आज मलकापूर एपीएमसीमध्ये 5 हजार 900 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण दर सोयाबीन मिळाला.
डिग्रस कृषी उत्पन्न बाजार समिती:- आज या एपीएमसीमध्ये एकशे पस्तीस क्विंटल सोयाबीनचे आवक झाली आज 6 हजार 250 रुपये प्रति क्विंटल एवढा कमीत कमी दर एपीएमसीमध्ये नमूद केला गेला. तसेच आज या एपीएमसीमध्ये 6 हजार 450 रुपये जास्तीत जास्त दर सोयाबीनला मिळाला आणि 6 हजार 385 रुपये सर्वसाधारण दर सोयाबीनला या एपीएमसीमध्ये बघायला मिळाला.
परतूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज सात क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज या एपीएमसीमध्ये 5 हजार 900 रुपये प्रति क्विंटल एवढा सोयाबीनला कमीत कमी दर मिळाला. तर 6 हजार 200 रुपये प्रति क्विंटल एवढा सोयाबीनला जास्तीत जास्त बाजार भाव बघायला मिळाला. शिवाय एपीएमसीमध्ये 6 हजार 100 रुपये एवढा सर्वसाधारण बाजार भाव सोयाबीनला मिळाला.
गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समिती:- आज राज्यात गंगाखेड एपीएमसीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक बाजार भाव मिळाला. या एपीएमसीमध्ये 26 क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. आज 6 हजार 300 रुपये कमीत कमी बाजारभाव सोयाबीनला मिळाला असून 6 हजार 500 रुपये प्रति क्विंटल एवढा जास्तीत जास्त बाजार भाव या एपीएमसीमध्ये आज मिळाला. 6 हजार 300 रुपये हा सर्वसाधारण दर सोयाबीनसाठी या बाजार समितीत मिळाला.