Soybean Market Price: सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Soybean grower farmer) एक चिंतेची बाब समोर येत आहे. मित्रांनो खरे पाहता दोन-तीन दिवसांपूर्वी साडेसहा हजार रुपये प्रति क्विंटल दराने सोयाबीनची (Soybean crop) विक्री होत होती.
मात्र आता यामध्ये दोनशे रुपयांपर्यंतची घसरण झाली आहे. राज्यातील प्रमुख बाजार समितीमध्ये (Apmc) सोयाबीनला 6 हजार 400 रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा कमाल बाजार भाव मिळत आहे. यामुळे निश्चितचं सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांची (Farmer) डोकेदुखी वाढणार असल्याचे चित्र आहे.
मित्रांनो खरे पाहता राज्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन (Soybean Production) घेतले जाते. अशा परिस्थितीत राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण सोयाबीन या नगदी पिकावर (Cash crop) अवलंबून असते. यामुळे सोयाबीन बाजार भावाकडे (soybean rate) शेतकऱ्यांचे मोठे बारीक लक्ष असते. आपण देखील आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी सोयाबीनचे बाजार भाव रोजच आणत असतो. चला तर मग मित्रांनो 18 ऑगस्टचे सोयाबीन बाजार भाव जाणून घेऊया.
कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती:- आज कारंजा एपीएमसीमध्ये आठ हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आद्या बाजार समिती सोयाबीनला 6130 रुपये प्रति क्विंटल एवढा जास्तीत जास्त बाजार भाव मिळाला तर तर पाच हजार 725 रुपये प्रति क्विंटल एवढा कमीत कमी बाजार भाव होता. आज सर्वसाधारण बाजार भाव 5 हजार 980 रुपये प्रति क्विंटल एवढा या एपीएमसीमध्ये नमूद करण्यात आला.
तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती:- तुळजापूर एपीएमसीमध्ये आज 110 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज या एपीएमसीमध्ये सोयाबीनला सहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा जास्तीत जास्त बाजार भाव मिळाला तर कमीत कमी बाजार भाव 5800 एवढा राहिला. आज या बाजारात सर्वसाधारण बाजार भाव 5 हजार 950 रुपये प्रति क्विंटल एवढा राहिला.
मोर्शी कृषी उत्पन्न बाजार समिती:- या बाजार समितीत आज 70 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. सहा हजार तीस रुपये प्रति क्विंटल एवढा जास्तीत जास्त बाजार भाव सोयाबीन भाव मिळाला तर कमीत कमी बाजार भाव पाच हजार आठशे एवढा नमूद करण्यात आला. सर्वसाधारण बाजार भाव पाच हजार 915 रुपये प्रति क्विंटल एवढा होता.
मालेगाव (वाशीम) कृषी उत्पन्न बाजार समिती:- मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 38 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. या ठिकाणी आज सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा जास्तीत जास्त बाजार भाव मिळाला तर कमीत कमी बाजार भाव 5500 एवढा राहिला. सर्वसाधारण बाजार भाव 5 हजार आठशे रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती:– सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 31 क्विंटल सोयाबीनची आवक नमूद करण्यात आली. आज या बाजार समितीमध्ये सोयाबीनला 6 हजार 50 रुपये प्रति क्विंटल एवढा जास्तीत जास्त बाजार भाव मिळाला, तर कमीत कमी बाजार भाव सहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा राहिला आणि सर्वसाधारण बाजार भाव देखील सहा हजार रुपये प्रतिक्विंटल एवढाच राहिला.
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती:– अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज सोयाबीनची 3849 क्विंटल आवक झाली. आद्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला सहा हजार 86 रुपये प्रति क्विंटल एवढा जास्तीत जास्त बाजार भाव मिळाला. आज या एपीएमसीमध्ये कमीत कमी बाजार भाव 5700 रुपये प्रति क्विंटल एवढा होता. आज सर्वसाधारण बाजार भाव 5 हजार 893 रुपये प्रति क्विंटल एवढा होता.
बीड कृषी उत्पन्न बाजार समिती:- या बाजार समितीत आज 68 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. या बाजार समितीत आज सोयाबीनला जास्तीत जास्त बाजार भाव 5 हजार 886 रुपये प्रति क्विंटल एवढा होता. तर कमीत कमी बाजार भाव पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा होता. पाच हजार 682 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण भाव आज सोयाबीनला मिळाला.
कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समिती:- या कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सोयाबीनचे 40 क्विंटल आवक झाली असून सोयाबीन ला जास्तीत जास्त बाजार भाव 5000 मिळाला तसेच किमान बाजार भाव तसेच सर्वसाधारण बाजार भाव देखील पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढाच होता.