Soybean Market Price: सोयाबीन (Soybean Crop) खरीप हंगामातील (Kharif Season) मुख्य पीक आहे. यामुळे या पिकावर राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधवांचे (Farmer) अर्थकारण अवलंबून आहे. अशा परिस्थितीत सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधव (Soybean Grower Farmer) नेहमीच सोयाबीनच्या बाजारभावाकडे (Soybean Rate) लक्ष ठेवून असतात.
आम्ही देखील आपल्या सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सोयीचे व्हावे या अनुषंगाने रोजच सोयाबीनचे ताजे बाजार भाव घेऊन हजर होतं असतो. आज आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळालेले बाजारभाव जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊ या राज्यातील प्रमुख बाजार समिती मधील सोयाबीनचे आजचे बाजार भाव.
सोयाबीनचे 20 ऑगस्टचे बाजारभाव:-
कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती:- आज कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची 2500 क्विंटल आवक झाली. या बाजार समितीत आज सोयाबीनला पाच हजार 650 रुपये प्रति क्विंटल एवढा कमीत कमी बाजार भाव मिळाला असून पाच हजार 950 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5775 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती:- आज तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकूण 115 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. या बाजार समितीत आज सोयाबीनला साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून सहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव होता. तसेच पाच हजार 850 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला.
मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती:- या बाजार समितीत आज सोयाबीनची 940 क्विंटल आवक झाली. त्या बाजार समितीत आज सोयाबीनला पाच हजार 300 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून सहा हजार 45 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5 हजार 800 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती:- आज या एपीएमसीमध्ये 1805 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. या एपीएमसीमध्ये आज पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान भाव सोयाबीन ला मिळाला असून 6040 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच 5700 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव आज सोयाबीनला मिळाला आहे.
मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती:-
या बाजार समितीमध्ये आज 23 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. या बाजार समिती मध्ये आज सोयाबीनला तीन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान भाव मिळाला असून 5915 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5 हजार 700 रुपये प्रति क्विंटल एवढा होता.भोकर कृषी उत्पन्न बाजार समिती:- आज या बाजार समितीमध्ये एकूण 38 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज या बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार रुपये एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5800 रुपये एवढा कमाल बाजार भाव मिळाला. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5 हजार चारशे रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
परतूर कृषी उत्पन्न बाजार समिती:- या बाजार समितीमध्ये आज एकूण सहा क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज या बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार 700 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 900 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच पाच हजार 856 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव राहिला आहे.
गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समिती:- या बाजार समितीमध्ये आज 32 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज या बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून कमाल बाजार भाव सहा हजार 250 रुपये प्रति क्विंटल येवढा होता. तसेच सर्वसाधारण बाजार भाव सहा हजार पन्नास रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.