Soybean Market Price : सोयाबीन (Soybean Crop) हे महाराष्ट्रात उत्पादित केले जाणारे एक मुख्य पीक आहे. सोयाबीन पिकावर महाराष्ट्रातील बहुतांशी शेतकरी बांधवांचे (Farmer) अर्थकारण अवलंबून आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या बाजार भावात (Soybean Rate) सातत्याने घसरण होत आहे.
त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना (Soybean Grower Farmer) मोठा फटका बसत आहे. मित्रांनो बाजारात अजूनही नवीन सोयाबीनची आवक बघायला मिळत नाहीये. मात्र तरीदेखील सोयाबीनच्या दरात (Soybean Bajarbhav) सातत्याने घसरण होत असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांची डोकेदुखी वाढली आहे.
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना नवीन सोयाबीन बाजारात दाखल झाल्यानंतर सोयाबीनच्या दरात अजून घसरण होते की काय अशी भीती भेडसावत आहे. मित्रांनो सध्या सोयाबीन साडेचार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतच्या सर्वसाधारण बाजार भावात विक्री होत आहे. मित्रांनो जस की आपणांस आपणास ठाऊकच आहे आम्ही रोजच सोयाबीनच्या बाजार भावाची माहिती घेऊन येत असतो.
आज देखील आम्ही राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळालेल्या बाजारभावाविषयी माहिती घेऊन हजर झालो आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया सोयाबीनला आज मिळालेले बाजार भाव.
चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 174 क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार 220 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5075 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार 850 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.
परळी वैजनाथ कृषी उत्पन्न बाजार समिती:– या बाजार समितीत आज 155 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4551 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5076 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच या एपीएमसीमध्ये झालेल्या लिलावात आज सोयाबीनला चार हजार 950 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- नागपुर एपीएमसीमध्ये आज 183 क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात नागपुर एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 935 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच साध्या एपीएमसीमध्ये झालेल्या लिलावात सोयाबीनला 4801 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.
हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती :- हिंगोली एपीएमसीमध्ये आज 305 क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात हिंगोली एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4800 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 108 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच चार हजार 954 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव हिंगोली एपीएमसीमध्ये नमूद करण्यात आला आहे.
ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समिती :- ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज नंबर एक सोयाबीनची 152 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार 900 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 150 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज या एपीएमसीमध्ये झालेल्या लिलावात सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.
लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- लातूर एपीएमसी सोयाबीनच्या लिलावासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ओळखली जाते. या एपीएमसी मध्ये आज झालेल्या लिलावात पिवळ्या सोयाबीनची 3556 क्विंटल आवक झाली. आज या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार 830 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 261 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच पाच हजार 160 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 616 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4300 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 150 रुपये प्रति क्विंटल एवढा समाज बाजार भाव मिळाला आहे. तसेच पाच हजार 95 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव आज या एपीएमसीमध्ये सोयाबीनला मिळाला आहे.
यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समिती :- विदर्भातील एक मुख्य बाजारपेठ म्हणून यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे.आज यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची 201 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात यवतमाळ एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4700 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 110 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज यवतमाळ एपीएमसीमध्ये झालेल्या लिलावात सोयाबीनला 4905 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.
चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती :- चिखली एपीएमसीमध्ये आज 173 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात चिखली एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4700 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 900 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज चिखली एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4800 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती :- वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीनच्या लिलावासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ओळखली जाते. ही एक मुख्य बाजारपेठ म्हणून अलीकडे उदयास आली आहे. वाशिम एपीएमसीमध्ये आज पिवळ्या सोयाबीनची 1200 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4600 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 199 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये झालेल्या लिलावात सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.
औसा कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज पिवळ्या सोयाबीनची 162 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4681 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 220 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार 98 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.