Soybean Market Price : सोयाबीन (Soybean Crop) हे खरीप हंगामातील (Kharif Season) एक मुख्य पीक आहे. सोयाबीनची आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. सोयाबीनच्या एकूण उत्पादनात आपल्या महाराष्ट्राचा मोठा सिंहाचा वाटा आहे.
राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधवांचे सर्व अर्थकारण सोयाबीन या मुख्य पिकावर अवलंबून आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोयाबीन बाजार भावात (Soybean Rate) सातत्याने घसरण होत असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधव (Soybean Grower Farmer) हवालदिल झाले आहेत.
सोयाबीनला सध्या पाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास बाजार भाव मिळत आहे. दरम्यान, राज्यात अजूनही बाजारपेठेत नवीन सोयाबीनची (New Soybean) आवक पाहायला मिळत नाही. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसात जेव्हा नवीन सोयाबीन बाजारात दाखल होईल तेव्हा सोयाबीनचा बाजार भावात (Soybean Bajarbhav) अजून घसरण होईल की काय अशी आशंका सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांच्या काळजाची धडधड वाढवत आहे.
दरम्यान आज आपण सोयाबीन बाजार भावाची माहिती जाणून घेऊया. मित्रांनो जस की आपणास ठाऊकच आहे आपण रोजचं सोयाबीनच्या बाजारभावाची माहिती जाणून घेत असतो. आज देखील आपण सोयाबीन बाजार भावाची माहिती जाणून घेणार आहोत.
मात्र आज रविवार असल्याने राज्यातील जवळपास सर्वच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यवहार बंद होते. फक्त औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये झालेल्या लिलावाची माहिती महाराष्ट्र राज्य पणन महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे.
सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज सिल्लोड एपीएमसी मध्ये झालेल्या लिलावात सोयाबीनची 21 क्विंटल आवक नमूद करण्यात आली आहे. आज झालेल्या लिलावात सिल्लोड एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे.
तसेच आज औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या लिलावात सोयाबीनला पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.
मित्रांनो, शेतकरी बांधवांच्या मते, सध्या सोयाबीनला मिळत असलेला बाजार भाव खूपच कमी असून यामध्ये सोयाबीन पिकासाठी आलेला उत्पादन खर्च काढणे मुश्कील आहे. दरम्यान बाजारात जेव्हा नवीन सोयाबीन दाखल होईल तेव्हा सोयाबीनच्या दरात घसरण होण्याची शक्यता देखील शेतकरी बांधवांना आहे.
जाणकार लोकांच्या मते, गतवर्षी सोयाबीनला चांगला बाजारभाव मिळाला असल्याने या वर्षी सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र देखील वाढले आहे. अशा परिस्थितीत सोयाबीन उत्पादनात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र काही जाणकार लोक राज्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला असल्याचा दावा करत आहेत यामुळे उत्पादनात देखील घट होणार असल्याचा त्यांचा दावा आहे. अशा परिस्थितीत आगामी काळात जेव्हा नवीन सोयाबीन बाजारात दाखल होईल त्यावेळी सोयाबीनला काय बाजार भाव मिळतो हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.