Soybean Market Price : सोयाबीन हे शाश्वत उत्पन्न देणारं पीक म्हणून ओळखलं जातं. मात्र यंदा हे पीक शेतकऱ्यांसाठी तोट्याचे ठरत आहे. गेल्या वर्षी सोयाबीनला चांगला विक्रमी दर मिळाला होता, यंदा देखील चांगला बाजारभाव मिळेल अशी शेतकऱ्यांची आशा होती.
मात्र शेतकऱ्यांची ही आशा फोल ठरली आहे. सोयाबीनला मात्र साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटलचे आसपास दर मिळत आहेत. आज तर भोकर एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4795 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळाला असल्याने पिवळं सोन म्हणून ओळखल जाणार सोयाबीन काळवंडल असल्याचे चित्र आहे.
इतरही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास सरासरी दर मिळत आहे. यामुळे उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी पाहायला मिळत आहे. दरम्यान आज आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळालेल्या बाजारभावाची चर्चा करणार आहोत.
अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 214 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4400 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5300 प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 4850 नमूद झाला आहे.
राहुरी वांबोरी कृषी उत्पन्न बाजार समिती :- नगर जिल्ह्यातील महत्त्वाची कृषी बाजारपेठ राहुरी वांबोरी एपीएमसी मध्ये आज 16 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला चार हजार 700 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5375 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5000 रुपये नमूद झाला आहे.
उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती :- उदगीर एपीएमसी मध्ये आज 2854 क्विंटल एवढी सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5600 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5550 रुपये नमूद झाला आहे.
कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- कारंजा एपीएमसी मध्ये आज 3500 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आजच झालेल्या लिलावा द्या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5,050 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5325 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5205 रुपये नमूद झाला आहे.
श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर एपीएमसी मध्ये आज 60 क्विंटल एवढी सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5200 प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5400 प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5300 नमूद झाला आहे.
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 5568 क्विंटल लोकल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5100 प्रत्येक गुंतले एवढा किमान दर मिळाला असून 5292 प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5196 रुपये नमूद झाला आहे.
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 1058 क्विंटल लोकल सोयाबीन आवक झाली. आता झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4350 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5342 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव ५०९४ नमूद झाला आहे.
हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 1000 क्विंटल लोकल सोयाबीन आवक झाली. हाच झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4800 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5475 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5137 रुपये नमूद झाला आहे.
लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 19472 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5000 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5600 रुपये नमूद झाला आहे.
जालना कृषी उत्पन्न बाजार समिती :- जालना एपीएमसी मध्ये आज सहा हजार सात क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4200 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5650 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5300 नमूद झाला आहे.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- अकोला एपीएमसी मध्ये आज 3906 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आता झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला चार हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5485 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5000 रुपये नमूद झाला आहे.
यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समिती :- यवतमाळ एपीएमसीमध्ये आज 984 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. या एपीएमसी मध्ये झालेल्या लिलावात आज पाच हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर सोयाबीनला मिळाला असून 5450 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल तसेच 5225 रुपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर मिळाला आहे.
भोकर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 171 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावा द्या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4141 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5450 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव ४७९५ रुपये नमूद झाला आहे.