बाजारभाव

Soybean Market Price : सोयाबीन बाजारभावाला लागली कुणाची नजर! आज पण सोयाबीन दरात घसरण, वाचा आजचे बाजारभाव

Soybean Market Price : मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात (Soybean Rate) सातत्याने घसरण होत आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी (Soybean Grower Farmer) बांधवांची चिंता वाढली आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, आगामी काही दिवसात नवीन सोयाबीनची (Soybean Crop) मोठ्या प्रमाणात बाजारात आवक होणार आहे.

अशा परिस्थितीत सोयाबीन दरात (Soybean Bajarbhav) होणारी घसरण निश्चितच चिंतेचा विषय ठरत आहे. महिनाभरापूर्वी सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव मिळत होता मात्र तदनंतर सोयाबीन दरात रोजच घसरण होत आहे. आज देखील सोयाबीनच्या बाजारभावात उतरती कळा बघायला मिळाली.

यामुळे आगामी काही दिवसात सोयाबीनचे दर वाढतील की नाही या संभ्रमावस्थेत सोयाबीन उत्पादक शेतकरी (Farmer) बघायला मिळतं आहेत. मित्रांनो जस की आपणांस ठाऊकच आहे आम्ही रोजच आपल्यासाठी सोयाबीन बाजारभावाची माहिती घेऊन हजर होत असतो.

अशा परिस्थितीत आज देखील आम्ही आपल्यासाठी राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (APMC) सोयाबीनला आज मिळालेल्या बाजार भावाविषयी माहिती घेऊन हजर झालो आहोत. चला तर मग वेळ न दवडता याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

भोकरदन कृषी उत्पन्न बाजार समिती :- भोकरदन एपीएमसीमध्ये आज 36 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली आज झालेल्या लिलावात भोकरदन एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4700 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 4800 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज झालेल्या लिलावात भोकरदन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार 750 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.

मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 43 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. मित्रांनो आज झालेल्या लिलावात मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन ला चार हजार तीनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5252 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज झालेल्या लिलावात मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला 4670 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts