बाजारभाव

Soybean Market Price : ब्रेकिंग! सोयाबीन दरात उसळी! सोयाबीनची सहा हजाराकडे वाटचाल, वाचा आजचे सोयाबीन बाजारभाव सविस्तर

Soybean Market Price : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनचा दरात (Soybean Rate) सातत्याने घसरण बघायला मिळत होती. मात्र आता सोयाबीनच्या दरात (Soybean Bajarbhav) वाढ होत असल्याचे चित्र आहे. सध्या राज्यात सोयाबीन साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत विक्री होत आहे.

त्यामुळे आगामी काही दिवसात सोयाबीनचे (Soybean Crop) बाजारभाव सहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत जाईल अशी शेतकर्‍यांना (Farmer) आशा आहे. मित्रांनो खरे पाहता गेल्या महिन्याभरापूर्वी सोयाबीनला सहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा बाजारभाव मिळत होता. मात्र तदनंतर सोयाबीनच्या बाजार भावात रोजच घसरण बघायला मिळाली.

मात्र आता सोयाबीनला गेल्या दोन दिवसांपासून साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचा बाजार भाव मिळत आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना (Soybean Grower Farmer) दिलासा मिळाला आहे. मित्रांनो खरं पाहाता सध्या मिळत असलेला बाजार भाव सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांच्या अपेक्षेप्रमाणे नसला तरीदेखील आगामी काही दिवसात सोयाबीनचे बाजार भाव वाढतील अशी शेतकर्‍यांची आशा आहे.

मित्रांनो आपण रोजच सोयाबीनचे बाजार भाव जाणून घेत असतो. आज देखील आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळालेल्या बाजारभावाविषयी चर्चा करणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया आजचे सोयाबीन बाजार भाव.

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- नागपूर एपीएमसी मध्ये आज 244 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात नागपुरी एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 275 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला. तसेच आज सोयाबीनला पाच हजार 56 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती :- हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 219 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात हिंगोली एपीएमसी मध्ये सोयाबीन ला 4600 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5 हजार 93 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच चार हजार 846 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव हिंगोली एपीएमसीमध्ये मिळणार आहे.

यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समिती :- यवतमाळ एपीएमसीमध्ये 156 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4800 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5255 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच पाच हजार बारा रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव या एपीएमसीमध्ये नमूद करण्यात आला आहे.

औसा कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 236 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4701 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 369 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच 5 हजार 185 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.

उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समिती :- उमरखेड एपीएमसीमध्ये आज 120 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात उमरखेड एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव सोयाबीनला मिळाला आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts