Soybean Market Price : सोयाबीन (Soybean Crop) हे एक प्रमुख तेलबिया पीक (Oilseed Crop) आहे. या पिकाची आपल्या महाराष्ट्रात विशेष उल्लेखनीय कशी लागवड केली जाते. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच विभागात सोयाबीन पिकाची शेती (Soybean Farming) मोठ्या प्रमाणात बघायला मिळते.
अशा परिस्थितीत सोयाबीन पिकावर राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधवांचे (Farmer) अर्थकारण अवलंबून असते. यामुळे सोयाबीनच्या बाजारभावाकडे (Soybean Rate) सर्वांच्याच बारीक लक्ष लागून असते. अशा परिस्थितीत आम्ही आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी रोजच सोयाबीनचे बाजार भाव देऊन हजर होत असतो. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया आज 27 ऑगस्ट 2022 रोजी महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Apmc) सोयाबीन पिकाला मिळालेला बाजार भाव.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 2116 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज या बाजार समिती सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमीत-कमी बाजार भाव मिळाला असून पाच हजार 845 रुपये प्रति क्विंटल एवढा जास्तीत जास्त बाजार भाव मिळाला आहे. तसेच सोयाबीनला पाच हजार 650 रुपये एवढा सर्वसाधारण बाजारभाव मिळाला आहे.
दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजार समितीत आज 800 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज या बाजार समितीत सोयाबीनला तीन हजार 940 रुपये प्रति क्विंटल एवढा कमीत कमी बाजार भाव मिळाला असून 5625 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सोयाबीनचा आजचा बाजार समितीत 5300 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.
उमरखेड डाँकी कृषी उत्पन्न बाजार समिती:- आज या बाजार समितीत सोयाबीनची 100 क्विंटल आवक झाली. आज या बाजार समितीत सोयाबीनला पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून सहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच पाच हजार 900 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव सोयाबीनला आज या बाजार समितीत मिळाला आहे.
परळी वैजनाथ कृषी उत्पन्न बाजार समिती:- या बाजार समितीचा सोयाबीनची 300 क्विंटल आवक झाली. आज या बाजार समितीत सोयाबीनला पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून जास्तीत जास्त बाजार भाव 5616 रुपये प्रति क्विंटल एवढा होता तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5 हजार 450 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.