Ahmednagar Bajarbhav : पाऊस लांबल्याचा परिणाम सर्वात जास्त शेतीवर झाला आहे. त्यामुळे रब्बीचा हंगाम धोक्यात आला असून भाजीपाल्याचे दर देखील वाढलेले आहेत.
जुलै अर्धा सरला आहे तरीदेखील अनेक भागात समाधानकारक पाऊस पडलेला नाही. परिणामी काही भागात पेरण्याच झालेल्या नाहीत तर काही भागात दुबार पेरणी करावी लागते की काय अशी परिस्थिती ओढावली आहे.
पाण्याच्या तुटवड्यामुळे भाजीपाल्याची स्थानिक आवक घटली असून बाहेरून भाजीपाला येत असल्यामुळे भाजीपाला जास्त दराने घ्यावा लागत आहे. त्यामुळे भाज्यांचे दर वधारले आहे. वांगी, मिरची, कोथिंबीर, शिमला मिरची, गवार, चवळी, भेंडी, कारली या भाज्या ५० ते ६० रुपये प्रति किलोच्या दराने मिळत आहे.
भाजीपाल्याचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. तर दुसरीकडे कांद्याचे भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडत आहे. बदलत्या हवामानाचा शेतीव्यवसायाला सवसंधिक फटका बसत आहे. त्यामुळे अनेक वस्तुंचे भाव गगनाला भिडले आहेत.
अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळालेले दर टोमॅटो ४००० ८५००, वांगी ८००-४०००, फ्लावर १८०० – ५०००, कोबी ५००-१५००, काकडी ५०० २८००, गवार ३००० – ६५००, घोसाळे २०००-३०००, दोडका २५०० ५०००, कारले २५०० ५०००, कैरी २५०० ४५००, भेंडी २०००-४०००,
वाल २००० ६०००, घेवडा २००० ५०००, बटाटे १४०० २०००, लसूण ६५००- १६०००, हिरवी मिरची ४०००-८०००, शेवगा ३५०० – १०,०००, भू. शेंग ३२०० ४५००, लिंबू ५०० १५००, आद्रक १०,००० १५,५००, गाजर १८०० – २३००,
दु.भोपळा ६०० – १५००, शिमला मिरची १५०० ५२००, मेथी १२०० – ३०००, कोथिंबीर १४०० – २८००, पालक १००० – २०००, शेपू भाजी १०००-२०००, चुका ८००-१६०० चवळी ३००० – ३५००.