अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :- केडगाव येथे मोहिनी नगर, देवी परिसर, अरणगाव रोड, दूधसागर सह इतर ठिकाणी परिसरातील वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे केडगाव येथील विद्युत महावितरणाच्या कार्यालयांमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते वैभव कदम समवेत केडगाव राष्ट्रवादी अध्यक्ष भरत गारुडकर व नागरिक उपस्थित होते. रात्री झालेल्या पावसाने ही लाईट गेलेली आहे.
वैभव कदम यांनी केडगाव महावितरण कार्यालयात फोन करूनही त्याची दखल घेतलेली नव्हती. त्यामूळे वैभव कदम यांनी याचा निषेध करत नागरिकांच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरू केले.
जोपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली त्यानंतर महावितरण’च्या कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली.
ठिय्या आंदोलन सुरू असतानाच केडगाव महावितरणचे अधिकारी आभाळे यांनी तात्काळ ठिय्या आंदोलनाची दखल घेत कर्मचाऱ्यांना वीज पुरवठा तात्काळ सुरळीत करण्याचे आदेश दिले.
व त्यानंतर तात्काळ वीज पुरवठा दुरुस्तीची मोहीम सुरू करण्यात आली. सर्व भागातील वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतरच दोन तासानंतर सदरचे आंदोलन मागे घेण्यात आले.
वारंवार महावितरण कार्यालयाशी संपर्क साधूनही प्रतिसाद मिळत नसल्याने ठिय्या आंदोलन करण्यात आल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved