अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :-पारनेर तालुक्यात आजपर्यंत ३७१ रूग्ण आढळून आले असून १६० रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. २०३ रूग्णांवर उपचार सुरू असून आठ रूग्ण दगावले असल्याची माहिती तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिली.
ग्रामीण रूग्णालय, पारनेर महाविद्यालयातील वसतिगृहांत उपचार करण्यात येत आहेत. काही रूग्ण नगर व सुपे येथील खासगी रूग्णालयातही आहेत.
आमदार नीलेश लंके यांनी कर्जुले हर्या येथे एक हजार बेड कोविड केअर सेंटरची उभारणी सुरू केली असून बुधवारी उदघाटन होणार आहे.
रविवारी तालुक्यात नऊ रूग्ण आढळून आले. त्यात वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कुटुंबातील व्यक्तीसह पारनेर शहरातील तीन, करंदी, कर्जुलेहर्या, मावळेवाडी, पाबळ, निघोज, वेसदरे येथील रूग्णांचा समावेश आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved