ब्रेकिंग

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यात भीषण अपघात 6 जण ठार, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यामधून अपघाताची एक बातमी समोर आली आहे. कल्याण-नगर महामार्गावर ढवळपुरी फाट्यानजीक एसटी बस, कार आणि ट्रॅक्टर अशा तीन वाहनांचा भीषण अपघात झाला आहे.

ढवळपुरी फाटया नजीक आज (२४ जानेवारी) बुधवारी पहाटे २.३० वाजता हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतांचा आकडा वाढू शकतो अशी भीती व्यक्त होत आहे.

अधिक माहिती नुसार : महामार्गावर उस वाहतुक करणारा ट्रक्टर व ठाणे – मेहकर एस.टी बस आणि इको गाडी यांची ढवळपुरी फाटया जवळ जोरदार टक्कर झाली. ही धडक इतकी जोरदार होती की, तिन्ही वाहनांचा अक्षरश: चुराडा झाला आहे. या दुर्घटनेत ६ जण ठार झाले असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अपघाताची माहिती परिसरात पसरताच पोलिसांसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरु केले होते.

अपघातातील जखमींना प्राथामिक उपचारासाठी पारनेर येथील रुग्णालयात आणण्यात आले होते तर काहींना नगरला सिव्हिलला नेण्यात आले होते. अपघातामुळे महामार्गावर झालेली वाहतूक कोंडी पोलिसांनी सुरळीत केली. सध्या अपघातग्रस्तांची ओळख पटविण्याचे काम सुरु असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts