ब्रेकिंग

अहमदनगर ब्रेकिंग : वीज चोरी प्रकरणी हॉटेल मालकावर गुन्हा दाखल

Ahmadnagar Breaking : वीजपुरवठा करणाऱ्या सर्व्हस वायरला टॅपिंग करून हॉटेलमधील उपकरणांना डायरेक्ट वीजपुरवठा केल्याप्रकरणी नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथील नगर- औरंगाबाद महामार्गावरील हॉटेल दीपकच्या मालकावर वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की प्रवरासंगम येथे दीपक दिलीप अगले (वय ४५) याचे हॉटेल दीपक नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलवर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला.

यावेळी हॉटेलला वीज पुरवठा करणाऱ्या सर्व्हस वायरची तपासणी करण्यात आली. या वायरला टॅपिंग करून हॉटेलमधील काही उपकरणांना थेट वीजपुरवठा केला जात असल्याचे समोर आले. यावेळी पथकाकडून हॉटेलचे वीज मीटर, वायर ताब्यात घेण्यात आली.

त्यानंतर महावितरणची ७ लाख १७ हजार ४५० रुप्याांची वीज चोरी केल्याप्रकरणी हॉटेल मालकावर विदद्युत कायदा २००३ नुसार १३५ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. २३ एप्रिल २०२४ रोजी हा छापा टाकण्यात आला होता. यावेळी दंडाचे बिल हॉटेल मालकाला देण्यात आले होते; परंतु हॉटेल मालकाने तडजोड रकमेचा भरणश केला नाही. त्यामुळे दि. १६ मे २०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts