Ahmednagar Breaking : व्याजाने घेतलेली रक्कम परत करुन देखील आणखी पैशाची मागणी केली. त्यानंतर पैसे न दिल्यास बळजबरीने जमीन नावावर करण्यासाठी संगनमत करुन अपहरण व मारहाण करुन डांबुन ठेवल्याचा प्रकार तालुक्यात नुकताच उघडकीस आला आहे.
याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार आठ जणांविरुद्ध नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ ११ लाखांच्या मुद्देमालासह तीन जणांना अटक केली आहे.
याबाबत तालुक्यातील आपेगाव येथील रहिवाशी शुक्लेश्वर उत्तम भुजाडे (वय ५०) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शरद आनंदराव गायकवाड, दत्तु आनंदराव गायकवाड, सुनिल भुजबळ, नारायण जाधव व प्रतिक उर्फ खंडु शरद गायकवाड, चेतन प्रभाकर मोरे, शैलेश राजेद वाघ व आणखी एक अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
त्यापैकी शरद आनंदराव गायकवाड, खंडु शरद गायकवाड यांना अटक केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. सदर गुन्हयातील अनोळखी दोन आरोपी शैलेश राजेंद्र वाघ व चेतन प्रभाकर मोरे यांची नावे सांगुन सदर गुन्हयात वापरलेली गाडी हि चेतन प्रभाकर मोरे याची असल्याचे समोर आल्याने चेतन प्रभाकर मोरे याला अटक केली आहे.
पोलिसांनी गुन्हयात वापरलेल्या गाडीसह तिघांना अटक केली आहे. तसेच सदर गुन्हयात वापरलेल्या दोन मोटरसायकल, असा एकुण ११ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहेत. तसेच पोलीस इतरांचा शोध घेत आहेत.
ही कामगरी पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या पथकाने केली आहे.