अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हजार पार करून पुढे गेल्याने चिंता वाढली आहे.
आता या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी १७ जुलैपर्यंत लागू केलेला प्रतिबंधात्मक आदेशाची ३१ जुलैपर्यंत मुदत वाढवली आहे.
कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केला होता. मात्र हा आदेश अहमदनगर महापालिका क्षेत्रात १७ जुलैपर्यंत लागू करण्यात आलेला होता.
या आदेशाची मुदत ३१ जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. या आदेशानुसार सायंकाळी सात ते पहाटे पाचपर्यंत संचारबंदी कायम राहणार आहे.
तसेच सकाळी ९ ते सायंकाळी पाच या वेळेत परवानगी असलेली सर्व दुकाने, आस्थापना नियमांचे पालन करून सुरू राहणार आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews