राष्ट्रपती पदक पुरस्कार विजेते प्राथमिक शिक्षक व सारोळा कासार (ता. नगर) येथील रहिवासी नामदेव सखाराम धामणे (वय ५०) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
ही घटना रविवारी घडली. दरम्यान शिक्षक धामणे यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. शिक्षक धामणे यांनी गळफास घेतल्याचे समजताच त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तथापि वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांची तपासणी केली असता त्यांना मयत घोषित केले. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे. मयत धामणे हे राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक असून त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे.
ते जि.प.च्या गाडेकर मळा (चिखली ता. श्रीगोंदा) येथे कार्यरत होते. पोलिसांना शिक्षक धामणे यांच्या जवळ चिठ्ठी सापडली असून त्यांच्या मृत्यूस कोणालाही जबाबदार धरू नये, असा मजकूर असल्याची माहिती मिळाली.