ब्रेकिंग

अहमदनगर ब्रेकिंग : एमबीबीएस’चे शिक्षण घेणाऱ्या युवतीची आत्महत्या

Ahmadnagar Breaking : एमबीबीएस’चे शिक्षण घेणाऱ्या युवतीची गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (दि.३) घडली. आश्विनी सोमनाथ जाधव (वय २०, रा. ढोकी चिचोली, जि. लातुर) असे त्या मयत युवतीचे नाव आहे.

मयत आश्विनी जाधव ही युवती डॉ. विखे पाटील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ‘एमबीबीएस’ चे शिक्षण घेत होती. ती तेथील वसतीगृह क्र. ६ मधील रूममध्ये राहत होती. तिने मंगळवारी रूम मध्ये गळफास घेतला.

ही बाब तेथील काही विद्यार्थिनींच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी वस्तीगृह प्रशासनाला माहिती दिली. त्यानंतर तिला तातडीने उपचारासाठी विखे पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी रूम मध्ये सर्वत्र तपासणी केली मात्र कुठेही सुसाईड नोट आढळून आली नाही.

तिच्या नातेवाईकांकडे चौकशी केली असता ती फोन वर अनेकदा आई वडिलांना आपल्याला अभ्यासाचा ताण सहन होत नसल्याचे सांगत होती. त्यामुळे तिने अभ्यासाच्या तणावामुळे आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज एमआयडीसी पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts