अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ४०५२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ११ हजार १९० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.३५ टक्के इतके झाले आहे.
दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २१०५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २० हजार ०६२ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ३८०, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ८६३ आणि अँटीजेन चाचणीत ८६२ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १०, अकोले ११३, कर्जत ०२, कोपरगाव ४०, नगर ग्रामीण ०१, नेवासा ९८, पारनेर ०२, पाथर्डी ०३, राहता ०२, राहुरी ०५, संगमनेर ६०, श्रीरामपूर २२, कॅंटोन्मेंट बोर्ड ०१, मिलिटरी हॉस्पिटल १९ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ११२, अकोले २१, जामखेड ३४, कर्जत १३, कोपरगाव १६, नेवासा ६९, पारनेर १०६, पाथर्डी ५४, राहाता ८०, राहुरी ४०, संगमनेर २३, शेवगाव १३५, श्रीगोंदा ६९, श्रीरामपूर २६, कॅंटोन्मेंट बोर्ड ४०, मिलिटरी हॉस्पिटल ०५ आणि इतर जिल्हा २० अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज ८६२ जण बाधित आढळुन आले. मनपा ०७, अकोले ७१, जामखेड १८, कर्जत ५३, कोपरगाव ११८, नेवासा ३५, पारनेर ६७, पाथर्डी ७२, राहाता १३१, राहुरी ५५, संगमनेर ७०, शेवगाव १६, श्रीगोंदा ५५, श्रीरामपूर ३०, कॅंटोन्मेंट ५३ आणि इतर जिल्हा ११ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १२९, अकोले २६०, जामखेड १११, कर्जत १५७, कोपरगाव १५४, नगर ग्रामीण ३७५, नेवासा ३०९, पारनेर २२०, पाथर्डी २७२, राहाता ३१७, राहुरी १९६, संगमनेर ५९४, शेवगाव ३०६, श्रीगोंदा १९७, श्रीरामपूर २०४, कॅन्टोन्मेंट २१, मिलिटरी हॉस्पिटल ११ आणि इतर जिल्हा ६५ अशा रुग्णांचा समावेश आहे.