AhmednagarLive24 : अहमदनगरच्या लाचलुचपत (एसीबी) विभागाने अहमदनगर वनविभागाच्या तीन अधिकार्यांना आज अटक केली आहे.
सन 2015-16 या आर्थिक वर्षात कर्जत तालुक्यात झालेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या भ्रष्टाचार प्रकरणी ही अटक करण्यात आल्याचे पोलीस उपअधीक्षक हरीष खेडेकर यांनी सांगितले.
वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर वृषीकेत पाटील, वनरक्षक बलभीम राजाराम गांगर्डे व वनरक्षक शेखर रमेश पाटोळे यांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून या दोन्ही गुन्ह्यात पाच आरोपी आहेत.