ब्रेकिंग

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात पुन्हा एक हनीट्रॅप ! ‘हा’ अधिकारी अडकला जाळ्यात…

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2022 :- हनीट्रॅपचे लोण ग्रामीण भागात देखील पसरत चालल्याचे दिसून येत आहे. याबाबत श्रीगोंदा तालुक्याचा देखील समावेश असून नुकतेच तालुक्यातील एक सरकारी बाबू या हनी ट्रॅपचा बळी ठरला आहे.

या अधिकाऱ्याकडून एका महिलेने लाखो रुपये उकळले असल्याची माहिती समोर आली आहे. सदर प्रकरण दडपण्यासाठी त्या सरकारी बाबूने जोरदार प्रयत्न केले मात्र त्यात तो अपयशी झाला.

लाखो रुपयेही गेले अन् प्रकरणाची अखेर चर्चा झाल्याने “तेलही गेले अन् तूपही गेले हाती आले धुपाटने” अशी अवस्था ‘त्या’ बाबूची झाली आहे.

श्रीगोंदा शहरातील एका महिलेची कामानिमित्त सरकारी कार्यालयात जात असताना तोंड ओळख होऊन पुढे त्या महिलेशी मैत्री झाली आणि सुरु झाले प्रेम प्रकरण.

या प्रेम प्रकरणात ती महिला आणि सरकारी अधिकारी यांच्या भेटी गाठी होऊन कधी एकत्र आले ते समजलेच नाही. काही दिवस उलटल्यानंतर त्या महिलेने अधिकाऱ्याला पैशाची मागणी केली केल्याने हे प्रकरण दोन लाख रुपयाला मिटले.

‘हनी ट्रॅप’मध्ये गुंतवून सरकारी बाबुला लुटल्याची घटना उघडकीला आल्याने श्रीगोंदा तालुक्यात खळबळ उडाली आहे. अशा अनेक गुन्हेगारी टोळ्या श्रीगोंदा तालुक्यात कार्यरत झाल्या आहेत.

अल्पावधीत कामधंदा न करता अनेकांकडे पैसा आला कोठून, हा देखील तालुक्यात चर्चेचा विषय झाला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts