अहमदनगर Live24 टीम, 31 ऑक्टोबर 2021 :- नगर जिल्ह्यातील एका मंत्र्याच्या पापाचा घडा भरला असून कोणी किती महसूल गोळा केला. हे आपोआप समोर येईल,’ असं सूचक वक्तव्य विखे पाटील यांनी केलं आहे.
विखे पाटील यांनी कोणाचंही नाव घेतले नाही. मात्र, त्यांचा रोख महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे होता. भाजपच्या सरकारने दुधाला प्रतिलीटर पाच रुपये अनुदान दिले होते.
मात्र, शेतकऱ्यांना अनुदान न देता अनेक दूध संघांनी ते पैसे हडप केले आहेत. संगमनेरमधील एका दूध संघाने तर शेतकऱ्यांचेच आधी कापून घेतलेले पैसे त्यांना परत देत अनुदान दिल्याचे भासविले.
अशा दूध संघांचा नागपूरच्या हिवाळी अधिवेशात भंडाफोड करणार आहोत,’ असा इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला. त्यांनी संगमनेरमधील दूध संघाचे नाव घेऊन थेट महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडेच इशारा केला आहे.
याबाबत विखे पाटील म्हणाले, ‘करोना काळात अधिवेशनाला मर्यादा होत्या. त्यामुळे अनेक प्रश्न असूनही ते मांडता येत नव्हते. करोनाच्या नावाखाली सरकारने अनेक गोष्टी रेटून नेल्या. आता करोनाचे संकट कमी झाल्याने नागपूरमधील हिवाळी अधिवेशन पुरेसा काळ चालेल अशी अपेक्षा आहे.
त्यावेळी दूध संघांनी शेतकऱ्यांची कशी फसवणूक केली, कोणत्या दूध संघाने किती पैसे लाटले, याचा आपण भांडाफोड करणार आहोत. दुधाचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत होते.
त्यामुळे तत्कालीन सरकारने दुधाला प्रतिलीटर पाच रुपये अनुदान दिले. मात्र, अनेक दूध संघांनी हे पैसे प्रत्यक्ष शेतकऱ्यांना दिलेच नाहीत. त्यांचा अधिवेशनात भांडफोड करणार आहे.
संगरनेरमधील एका सहकारी दूध संघाने शेतकऱ्यांकडून वर्षभर दुधाचे पैसे कापले. नंतर तेच त्यांना परत दिले. शेतकऱ्यांकडून घेतलेले पैसेच परत देत अनुदान दिल्याचे सांगितले.
ही गोष्ट तेथील शेतकऱ्यांच्याही लक्षात आली आहे. या विरोधात शेतकरी आंदोलन करणार आहेत,’ असे सांगत विखे यांनी थोरात यांच्याशी संबंधित दूध संघाकडेच इशारा केला आहे.