Ahmednagar breaking : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील मातंग समाजातील अजय विष्णू जोगदंड यांनी बोधेगाव पोलीस दूरक्षेत्रासमोर मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी ९ जणांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत जोगदंड यांनी दाखल केलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, मी रविवार, (दि.१७) डिसेंबर रोजी रात्री १० वा.च्या सुमारास बोधेगाव येथील पाकीजा पान स्टॉल येथे मावा सुपारी आणण्यासाठी गेलो असता,
मला तेथे उस्मान चाँद कुरेशी व समद चाँद कुरेशी हे दोघे म्हणाले की, तू आमच्याविषयी ११२ नंबरवर तक्रार करतो काय, असे म्हणून कॉल केल्याचा राग मनात धरून त्या दोघांनी मला चापटीने मारहाण केली मी लगेच बोधेगाव पोलीस चौकीत गेलो व तेथून माझी आई अलका विष्णू जोगदंड व भाऊ राजू विष्णू जोगदंड यांना फोन करून सांगितले असता,
तेथे शकील चाँद कुरेशी, आरशद उस्मान कुरेशी, अरबाज शकील कुरेशी, अज्जू इस्माईल कुरेशी, सलीम अब्बास कुरेशी, अलफैज शकील कुरेशी व इरफान इस्माईल कुरेशी,
या सर्वांनी मिळून मला, माझी आई व भावास लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली तसेच तुम्ही लय माजले का? असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर जोगदंड यांनी शेवगाव पोलीस स्टेशनला जाऊन फिर्याद दाखल केली आहे.