अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील महांकाळ वाडगांव येथील दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. गोदाकाठावर स्नान करण्यासाठी हे दोघे सकाळी सहा वाजता घरातून गेले होते.
खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला. सचिन बाजीराव वानखेडे (२८) व भाऊराव पांडूरंग वानखेडे (३५) से मृतांचे नावे आहेत.
दोघेही तरुण विवाहित असून सचिन याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा एक मुलगी आई, वडील तर भाऊराव याच्या पश्चात पत्नी, ३ मुली, एक मुलगा, आई व वडील आहे.
कोरोनाच्या पार्शवभूमीवर मंदिरे बंद असल्याने पहाटे सुर्योदयाबरोबर गावांतील गोदाकाठावर स्नान करून महादेवाचे दर्शन घेऊ असा विचार करून हे तरुण गोदाकाठी गेले होते.
या घटनेमुळे महांकाळ वाडगांवावर शोककळा पसरली आहे. सराला गोवर्धन, नाऊर येथील तरुणांकडून मृतदेह शोधण्याचे काम सुरू केले असून भाऊराव यांचा मृतदेह सापडला असून सचिनचा शोध सुरू आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved