अहमदनगर ब्रेकिंग : कारची दुचाकीला धडक, शिक्षकाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,11 ऑगस्ट 2020 :-संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे शिवारातील हाडवळा परिसरात वॅगनर कारची दुचाकीला धडक बसून शिक्षक रामहरी लहानू भागवत (वय ४४) यांचा मृत्यू झाला. 

तळेगाव दिघे – कोपरगाव रस्त्यावर रविवारी दुपारी ही दुर्घटना घडली. न्यू इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक भागवत हे दुचाकीवरून (एमएच १७ बीजे ८९१९ ) जात होते.

वॅगनरची धडक बसून ते जबर जखमी झाले. त्यांना संगमनेर येथील कुटे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

याबाबत गणेश एकनाथ अरगडे (सुकेवाडी) यांनी फिर्याद दिली. वॅगनरचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भागवत यांच्यामागे आई-वडील, चार बहिणी, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts