अहमदनगर ब्रेकिंग ! कोरोनाने घेतला आणखी एका मुख्याध्यापकाचा बळी

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्याने चिंता वाढली आहे.

जामखेडमध्ये काही दिवसांपूर्वी कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला यश मिळाले होते. परंतु लॉकडाऊन उठल्यानंतर पुन्हा जामखेडमध्ये कोरोना रुग्ण वाढले आहेत.

नुकतेच जामखेडमधून एक धक्कादायक वृत्त आले आहे. जामखेड तालुक्यातील पाडळी येथील साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शरद वराट यांचा नुकताच कोरोनाने दुर्दैवी मृत्यू झाला.

त्यांच्यावर नगर येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. शरद वराट हे पाडळी येथील शाळेवर गेल्या पंधरा वर्षांपासून नोकरी करत होते.

त्यांना चार दिवसांपासून श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांनी जामखेड येथे कोरोनाची तपासणी करून घेतली. या तपासणीमध्ये त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले.

त्यामुळे त्यांना नगर येथील हॉस्पिटल मध्ये मागील रविवारी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अखेर शनिवारी पहाटे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

जामखेडमध्ये आता रुग्णसंख्येने शंभरी पार केली आहे. नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने नागरिकांना करण्यात आले आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts