अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :- जिल्ह्यात अद्यापही कोरोनाचे संक्रमण सुरूच आहे. यातच नुकतेच जिल्ह्यातील शाळा सुरु करण्यात आल्या होत्या. यातच एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर येत आहे.
पाथर्डी तालुक्यातील डमाळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकाचा करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांची करोना तपासणी केल्यानंतर पाच विद्यार्थी करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे शिक्षण विभागाने २३ डिसेंबरपर्यंत ही शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, पाच विद्यार्थ्यांमध्ये गंभीर लक्षणे नसून त्यांच्या पालकांचीही करोना चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली.
याबाबत अधिक सविस्तर माहिती अशी पाथर्डी तालुक्यातील डमाळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापकाचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांचेही करोना चाचणी करण्यात आली.
यामध्ये १५ विद्यार्थ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले तर पाच विद्यार्थ्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. मुख्याध्यापकासह पाच विद्यार्थ्यांची तब्येत ठणठणीत असली तरी ग्रामस्थांनी व शिक्षण विभाग यांनी सुरक्षेच्या कारणाने २३ डिसेंबरपर्यंत येथील जिल्हा परिषद शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले.