अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :- कोपरगाव तालुक्यातल्या चांदेकसारे येथील एका ६५ वर्षीय कोरोना बाधिताचं निधन झालंय. त्याच्यावर अहमदनगर येथे उपचार सुरु होते. काही दिवसापूर्वी हा रुग्ण बाधित आढळला होता.
त्याचं उपचारादरम्यान अहमदनगरच्या कोविड सेंटरमध्ये निधन झालं, अशी माहिती पोहेगांव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितिन बडदे यांनी दिलीय.
दरम्यान, कोपरगावमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असून नागरिकांनी सोशल डिस्टंसिंगच्या प्रोटोकॉलचा आणि मास्कचा वापर करावा.
त्याचप्रमाणे स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले जात आहे. ज्या भागात हा रुग्ण राहत होता, त्या परिसरावर प्रशासनाची विशेष लक्ष आहे. स्वयंसेवकांमार्फत हा भाग सील करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved