अहमदनगर ब्रेकिंग : वंचित बहुजनच्या शहराध्याक्षांचा अपघातात मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :- रस्त्याच्या कडेला उभ्या ओमनीला अज्ञात वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात संगमनेरचे दोन तरुण ठार झाले. हा अपघात मंगळवारी रात्री १२.३० वाजता सिन्नर येथील नाशिक-पुणे बायपासवरील सिल्व्हर लोटस् हायस्कूलसमोर झाला.

मृतांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष राजेंद्र आखाडे यांचा समावेश आहे. संतोष देवराम आखाडे (४०, घुलेवाडी) व राजेंद्र नानासाहेब आखाडे (४०, तिरंगा चौक, संगमनेर) हे ओमनीतून नाशिकहून संगमनेरला येत होते.

सिन्नरमध्ये कारचे टायर पंक्चर झाले. स्टेपनी बदलण्यासाठी कार उभी केली होती. अज्ञात वाहनाची धडक बसून दोघे जागीच ठार झाले.

सिन्नर पोलिसांनी दोघांना रुग्णालयात हलवले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला होता. बुधवारी सकाळी ही घटना संगमनेरमध्ये समजताच हळहळ व्यक्त करण्यात आली.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts