ब्रेकिंग

Ahmednagar Breaking : भीषण अपघातात वडिलाचा मृत्यू ; मुलगी जखमी, ‘ते’ स्वप्न राहिले अधुरे…!

Ahmednagar Breaking : नगर – छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील अपघातांची मालिका काही थांबत नाही. या भागात रोज एक तरी अपघात होतोच. याच घाटात आज (दि.१८) सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास मोटारसायकल आणि कंटेनर यांचा भीषण अपघात झाला.

या अपघातात मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला असून मुलगी जखमी झाली आहे. मृत झालेले नेवासे तालुक्यातील खरवंडी येथील रहिवाशी असून अनिल दगडू फाटके असे त्यांचे नाव आहे. तर त्यांची मुलगी जखमी झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, नेवासे तालुक्यातील खरवंडी येथील रहिवाशी असून अनिल दगडू फाटके हे त्यांच्या मुलीला नगर शहरातील महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी मुलीसह नगरला येत होते. परंतु नियतीच्या मनात काहीतरी दुसरेच होते.

हे ‘बापलेक’ इमामपूर घाटात आले असता, डांबराची पिंपे घेऊन छत्रपती संभाजीनगरकडे घेऊन जाणारा कंटेनर व फाटके यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात बापलेक दोघेही गंभीर जखमी झाले.

या अपघाताची माहिती समजताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस अपघातस्थळी पोहोचले. तातडीने रुग्णवाहिकेला पाचारण करुन जखमी मुलीला आणि तिच्या वडिलांना उपचारार्थ दवाखान्यात दाखल करण्यात आले परंतु फाटके यांचा मृत्यू झाला तर मुलीवर उपचार सुरु आहेत.

दरम्यान या अपघातात कंटेनर उलटल्याने इमामपूर घाटात वाहनांची मोठी गर्दी झाली होती. या अपघाताने एक बापाचे आपल्या मुलीला उच्च शिक्षित करण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. या दुर्दैवी घटनेमुळे नेवासा तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts