ब्रेकिंग

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात ‘येथे’ पुरूषाचा मृतदेह आढळला !

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022Ahmednagarlive24:-  तोफखाना पोलीस ठाणे हद्दीतील वैदुवाडी परिसरात श्रमिकनगरच्या कमानीजवळ अनोळखी पुरूषाचा मृतदेह आढळून आला. त्यांचे वय अंदाजे 60 वर्ष आहे.

याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वैदुवाडी परिसरात मृतदेह असल्याची खबर तोफखाना पोलिसांना आली होती.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. श्रमिकनगरच्या कमानीजवळ हा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती.

पोलिसांच्या मदतीने मृतदेह जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आला. दरम्यान हा पुरूष कोण? त्याचा मृत्यू कशामुळे झाला? याबाबत तोफखाना पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

मृतदेहाचे जिल्हा शासकीय रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. अधिक तपास पोलीस हवालदार क्षीरसागर हे करीत आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts