अहमदनगर ब्रेकिंग: ‘ह्या’ परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्हा सध्या कोरोनाच्या संकटाशी लढा देत आहे. त्यात संगमनेर तालुक्यातील परिस्थिती सर्वात जास्त घातक बनली आहे.

अशातच या संकटाला तोंड देतानाच या तालुक्यातील बोटा, माळवाडीलगतच्या गावांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के बसले.

शुक्रवारी पहाटे व सकाळी ठराविक वेळेच्या अंतराने बोटा, माळवाडी, केळेवाडी, आंबीदुमाला, कुरकुटवाडी परिसरात धक्के जाणवले.

शुक्रवारी पहाटे तीन वाजल्यानंतर सकाळपर्यंत अंतराने हे भूगर्भातील हालचाली जाणवल्या. भूगर्भातून मोठा आवाज आल्याचेही जाणवले.

दरम्यान, बोटा परिसरात शुक्रवारी पहाटेनंतर जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता अत्यंत कमी होती. या घडामोडींच्या नोंदी नाशिक येथील भूकंपमापक यंत्रावर झाल्या नसल्याचे मेरी संस्थेच्या भूवैज्ञानिक चारूलता चौधरी यांनी सांगितले.

दरम्यान अहमदनगरमध्ये कोरोनाची परिस्थिती आणि संक्रमण वाढत चाललेले असताना सदर घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts