ब्रेकिंग

अहमदनगर ब्रेकिंग : दुधाचा टॅंकर पलटी, हजारो लिटर दुधाचे झाले असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :- राहुरी तालुक्यातील आरडगाव-मानोरी शिव रस्त्यावर दुधाचा टॅंकर पलटी होऊन हजारो लिटर दूध वाया गेले तर टॅंकर चालक किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे.

दुपारी १२ वाजण्याच्या सुमारे एम.एच १६ ए.ई. ५४२५ क्रमांकाचा दुधाने भरलेला टॅंकर दुध संकलन केंद्रातून भरून

ब्राम्हणी येथील दुध डेरीकडे भरधाव वेगाने चालला असताना आरडगाव येथील साळुंके वस्ती शेजारी पलटी झाला आहे.

त्यामुळे टॅंकर चालक जखमी झाला असुन त्यास उपचारासाठी रूग्णालयात हलविण्याच्या आले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts