ब्रेकिंग

अहमदनगर ब्रेकिंग : प्रश्नपत्रिका जळाल्या की जाळल्या ? पालकांची चिंता …

3 years ago

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :-  पुणे महामार्गावर चंदनापुरी ( ता. संगमनेर, जि. अहमदनगर ) परिसरात 12वीच्या प्रश्नपत्रिका पुण्याला घेऊन चाललेला एका टॅम्पोला आग लागल्याने, यात बऱ्याचशा प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या तर उर्वरित प्रश्नपत्रिका आग विझविताना खराब झाल्या आहेत.

आता या घटनेवर माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रश्नपत्रिका जाळल्या की, जळाल्या असा प्रश्न उपस्थित केला आहे.

तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. बारावीच्या प्रश्नपत्रिका घेवून जाणार्‍या टेम्पोला लागलेल्या आगीची घटना अतिशय गंभीर असून, या संदर्भात विखे यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे.

ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात भरती प्रक्रीयेची कोणतीही परिक्षा पारदर्शकपणे झाली नाही. सर्वच परिक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रकार वारंवार घडल्याने या सरकारच्या काळात सर्वच परिक्षा संशयाच्या भोवर्‍यात आहेत.

दहावी, बारावीच्या परिक्षा तोंडावर असताना प्रश्नपत्रिका घेवून जाणार्‍या टेम्पोला आग लागण्याची घटना अतिशय गंभीर आहे.

तसेच परिक्षा महामंडळाने तांत्रिक कारण सांगून पेपरच्या तारखा पुन्हा नव्याने जाहीरही करुन टाकल्या. परंतू यातील नेमके तांत्रिक कारण कोणते?

असा प्रश्न अनुत्तरीत आहे. प्रश्नपत्रिका जळाल्या की जाळल्या याबाबत कोणताही खुलासा परिक्षा महामंडळ करु शकलेले नाही.

त्यामुळे या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. अशी मागणी विखे यांनी केली आहे. तसेच पुढे बोलताना विखे म्हणाले की, एकीकडे कोव्हीड संकटाने सर्वाधिक नुकसान शिक्षण क्षेत्राचे झाले आहे.

सरकार स्वत:चेच निर्णय मागे घेत राहीले. शाळा सुरु करण्यापासून ते दहावी, बारावीच्या परिक्षांच्या बाबतीतही सरकार ठाम राहीले नाही.

आघाडी सरकारचा कारभार हा पुर्णत: गोंधळलेला असल्याची टिका करुन, सरकारच्या निर्णयातील धरसोड वृत्तीच विद्यार्थी आणि पालकांची चिंता वाढवत असल्याचे दिसत आहे.

Recent Posts