अहमदनगर Live24 , 29 एप्रिल 2020 :- अकोले तालुक्यातील म्हाळादेवी परिसरात अवैध धंद्यांची माहिती देणार्या प्रिया मधे या महिलेस पतीने धारधार हत्याराने भोकसल्याचा प्रकार समोर आला आहे.
संबंधित महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, माझ्या नवर्यानेच माझ्यावर वार केले आहेेत. म्हणून मी जखमी झाले आहे. गेल्या पाच दिवसानंतर प्रिया यांची प्रकृती स्थिर असून या घटनेप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान पोलिसांनी राजू मधे यास अटक केली असून उद्या पोलीस कोठडीसाठी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अशी माहिती पोलीस अधिकार्यांनी दिली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, हल्ला झालेल्या महिलेची आई म्हाळदेवी गावाच्या सरपंच आहेत.म्हाळादेवी परिसरात राजू मधे याचे आदिवासी कुटूंब आहे.
तो गावठी हातभट्टी चालवत असल्याची माहिती गावातील काही जागरुक तरुणांनी पोलिसांना पाच दिवसांपुर्वी दिली होती. पाच दिवसानंतर अकोले पोलिसांचे पथक थेट म्हाळादेवीत दाखल झाले. गावकर्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस कारवाईसाठी गेले असता
काही महिलांनी मोठे धाडस करुन यावर आवाज ऊठविण्याचा प्रयत्न केला. त्यात प्रिया देखील असल्याचे तिच्या पती समजले. त्यामुळे, त्यांच्यात किरकोळ वाद झाला.
दरम्यान दोघांच्या बाचाबाचीचे रुपांतर मोठ्या वादात झाले आणि पतीपत्नीचा वाद विकोप्याला गेला. त्यानंतर राजुने थेट पत्नीला धारधार हत्याराने भोकसून मारण्याचा प्रयत्न केला. मंगळवार दि.28 याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®