अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- नगर तालुक्यातील खारेकर्जुने येथील स्मिता प्रताप पाटील शेळके ( वय -४५ ) याचे हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती , एक मुलगा , एक मुलगी, सासु असा परीवार आहे . जिल्हा परीषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके यांच्या त्या पत्नी होत .
तसेच जिल्हा परीषदेचे माजी अर्थ व बांधकाम समितीचे सभापती रावसाहेब शेळके यांच्या भावजई, उपसरपंच अंकुश शेळके यांच्या चुलती होत्या.