अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : 26 रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 टीम ,4 जुलै 2020 : आज अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे २६ रुग्ण वाढले आहेत, शहरातील ८ जणांसह जिल्ह्यात २६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज २६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये संगमनेर तालुक्यातील १३, नगर शहर ०८, कोपरगाव तालुका ०२,अकोले ०२ आणि बीड जिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.

आज दुपारी हे अहवाल जिल्हा रुग्णालयाकडे प्राप्त झाले. यामध्ये नगर शहरातील ८ रुग्णांसह कोपरगाव तालुक्यातील कारंजा चौक, येसगाव आणि धारणगाव दवंडे मामा वस्ती येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आले.

अकोले शहरात ०२, संगमनेर तालुक्यातील कुरण येथे ०८, संगमनेर खुर्द येथे ०१, घुलेवाडी येथे ०१, संगमनेर शहरातील रहेमत नगर, विठ्ठलनगर,श्रमिकनगर येथेही प्रत्येकी एक रुग्ण आढळला.

याशिवाय, बीड जिल्ह्यातील कारखेल (ता. आष्टी) येथील एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts