अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : जिल्ह्यात गेल्या २४ तासात जिल्हा रुग्णालयाची कोरोना टेस्ट लॅब, अँटीजेन चाचण्या आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेले असे मिळून एकूण १५१ रुग्णांची नोंद झाली.
कोरोना टेस्ट लॅबमध्ये ९० जणांचे अहवाल बाधित आढळले. अँटीजेन चाचणीमध्ये ०८ जण बाधित आढळले तर खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या अहवालात पॉझिटिव्ह आढळून आलेल्या आणि आयसीएमआर पोर्टलवर नोंद झालेल्या ५३ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली.
यामुळे उपचार सुरू असलेल्या एकूण रुग्णांची संख्या आता १३३७ इतकी झाली असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या १३८४ इतकी आहे. जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या आता २७७१ इतकी झाली आहे.
दरम्यान, जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅब मध्ये काल (बुधवारी) सायंकाळपासून आज सायंकाळ पर्यंत रुग्ण संख्येत ९० ने वाढ झाली. बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये,
भिंगार (२६) – ब्राम्हणगल्ली (3), नेहरुचौक (3) माळीगल्ली (2) गवळीवाडा (4),कुंभारगल्ली (1), घासगल्ली (1), मोमिनगल्ली (1) विद्याकॉलनी (1) शुक्रवार बाजार (2) कॅंटॉनमेंट चाळ (1), सरपनगल्ली (3), पंचशिल नगर (1), काळेवाडी (1), आंबेडकर कॉलनी (1), भिंगार (1)
अँटीजेन चाचणीत आज ०८ जण बाधित आढळले. त्यात, श्रीरामपूर ०७ आणि राहाता ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ५३ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये,
श्रीरामपूर ०२, संगमनेर ०७, मनपा २०, राहाता ०८, नगर ग्रामीण १०, पारनेर ०२, पाथर्डी ०१, शेवगाव ०१, अकोले ०२.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com